अरे काय चाललंय..! वंदे भारत ट्रेनचं पुन्हा नाक तुटलं; अपघाताची हॅट्ट्रिक

WhatsApp Group

Mumbai Gandhinagar Vande Bharat Train Hits Bull : देशातील सर्वात वेगवान ट्रेन वंदे भारतला पुन्हा अपघात झाला. गुजरातमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली, मुंबईहून गांधीनगरकडे जाणाऱ्या या ट्रेनसमोर बैल आदळला. धडकेमुळे ट्रेनचा पुढील भाग तुटला. मात्र, काही वेळ थांबल्यानंतर ही गाडी पुन्हा रवाना करण्यात आली. ऑक्टोबरमध्ये वंदे भारतने आतापर्यंत तीन वेळा गुरांना धडक दिली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वंदे भारत एक्सप्रेस वलसाडमधील अतुल रेल्वे स्टेशनवरून जात असताना सकाळी ८.१७ वाजता ही घटना घडली. तेवढ्यात एक बैल त्याच्या समोर आला. धडकल्याने गाडीचा पुढील भाग तुटला. घटनेनंतर ट्रेन जवळपास २६ मिनिटे स्टेशनवर उभी होती, त्यानंतर ती रवाना करण्यात आली. २२ दिवसांपूर्वी ७ ऑक्टोबर रोजी मुंबई सेंट्रल-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस गायीला धडकली होती. ६ ऑक्टोबरलाही अहमदाबाद रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची म्हशींच्या कळपाशी टक्कर झाली. या अपघातात चार म्हशींचा मृत्यू झाला.

हेही वाचा – IND Vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये पाऊस पडणार? वाचा कसं असणार हवामान

देशातील पहिली हायस्पीड ट्रेन

देशातील पहिली हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस सध्या तीन मार्गांवर धावत आहे. दिल्ली ते वाराणसी, दिल्ली ते कटरा आणि ३० सप्टेंबर रोजी गुजरातमधील गांधी नगर ते मुंबई अशी वंदे एक्सप्रेस सेवा सुरू झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. त्याची वेग मर्यादा १८० किमी प्रतितास आहे. येत्या काही महिन्यांत ते ताशी २०० किलोमीटर वेगाने धावण्यास सुरुवात होईल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment