गुजरातमध्ये बुधवारपासून सुरू झालेल्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये (Vibrant Gujarat Global Summit 2024) आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठी घोषणा केली आहे. आपल्या भाषणात ते म्हणाले की, राज्यात रिलायन्सची गुंतवणूक पुढील 10 वर्षे सुरू राहील आणि 2030 पर्यंत गुजरातच्या एकूण हरित ऊर्जेच्या वापरापैकी निम्मी ऊर्जा त्यांची कंपनी तयार करेल.
रिलायन्सचे चेअरमन म्हणाले, की हरित विकासात गुजरातचा जागतिक नेता म्हणून उदयास येण्यासाठी रिलायन्सने जामनगरमध्ये 5,000 एकरवर धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू केले आहे. अंबानींच्या मते, यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रीन नोकऱ्या निर्माण होतील. याद्वारे हरित उत्पादने आणि इतर सामग्रीचे उत्पादन करणे शक्य होईल, ज्यामुळे गुजरात हरित उत्पादनांचा अग्रेसर निर्यातदार होईल.
7 कोटी गुजरातींचे स्वप्न पूर्ण होणार
गुजरातला आपली मातृभूमी आणि कर्मभूमी असल्याचे सांगताना मुकेश अंबानी म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत रिलायन्सने देशात सुमारे 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि यापैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या गुजरातमध्ये झाली आहे. 7 कोटी गुजरातींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी रिलायन्स कोणतीही कसर सोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
हेही वाचा – महिला सशक्तीकरण अभियानातून 38 हजार 500 लाभार्थ्यांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, मला गुजराती असल्याचा अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत, मोदी है तो मुमकिन है’. जेव्हा मोदी बोलतात तेव्हा जग त्यांचे ऐकते आणि कौतुकही करते. मोदी अशक्य गोष्ट शक्य करत आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!