VIDEO : “लोकांच्या भावनेशी खेळू नकोस..!”, धोनीचा ‘तो’ प्रकार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर!

WhatsApp Group

MS Dhoni BIG Announcement : आपल्या नेतृत्वाखाली भारताला दोनदा विश्वविजेता बनवणारा महान यष्टीरक्षक-फलंदाज आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी याने आज रविवारी एक घोषणा केली. धोनी प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करू शकतो, असे अनेक चाहत्यांना वाटत असले तरी असे काही घडले नाही. ४१ वर्षीय धोनीच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी नेटकऱ्यांनी त्याच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे.

धोनीची नवी घोषणा…

४१ वर्षीय धोनीने ओरियो बिस्किट लाँच केले. याबाबत त्यानं एका व्हिडिओद्वारे माहिती दिली. धोनी म्हणतो की, हे बिस्किट २०११ मध्ये भारतात आले आणि त्यानंतर टीम इंडियाने वर्ल्ड कपही जिंकला. आता पुन्हा एकदा तो भारतात लाँच झाला असून त्यामुळे वर्ल्डकपही येणार आहे. त्याने आपली केशरचना तशीच ठेवली आहे. धोनीने काल शनिवारी म्हणजेच २४ सप्टेंबरला लाइव्ह येणार असल्याची घोषणा केली. धोनी नक्की काय सांगणार आहे, याची चाहत्यांना उत्सुकता होती. पण ही एक बिस्कीट कंपनीची जाहिरात असल्याचे सिद्ध झाले.

हेही वाचा – चुकीला माफी नाहीच..! अजिंक्य रहाणेनं आपल्याच संघाच्या खेळाडूला मैदानाबाहेर काढलं; पाहा VIDEO

 

 

हेही वाचा – Navaratri 2022 : महिलांचा स्विमिंग पूलमध्ये गरबा डान्स..! VIDEO व्हायरल

धोनीने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तथापि, यानंतरही, तो इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत राहिला आणि यापुढेही खेळत राहील. ७ जुलै २०२२ रोजी ४१ वर्षांचा झालेल्या धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९० कसोटी, ३५० एकदिवसीय आणि ९८ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत सहा शतके आणि ३३ अर्धशतके केली. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर द्विशतकही आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने १० शतके आणि ७३ अर्धशतके केली आहेत. भारतासाठी टी-२० मध्ये त्याच्या नावावर दोन अर्धशतके आहेत. धोनीच्या कसोटीत ४८७६, एकदिवसीय सामन्यात १०७७३ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये १६१७ धावा आहेत. धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये एकूण ३६१ सामने खेळले आणि २८ अर्धशतकांच्या मदतीने एकूण ७१६७ धावा केल्या.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment