राहुल गांधींना भेटल्यानंतर शिक्षकाची गेली नोकरी..! नक्की प्रकरण काय? वाचा

WhatsApp Group

Teacher Suspended For Participating Bharat Jodo Yatra : मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील कुजरी विद्यालयातील प्राथमिक शाळेचे शिक्षक राजेश कनोजे सध्या चर्चेत आहेत. २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांसह भारत जोडो यात्रा गाठल्यानंतर राहुल गांधी यांची भेट घेतली. आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर बोलल्यानंतर त्यांना धनुष्य बाणही देण्यात आले. दुसऱ्या दिवशी सहायक आयुक्त बडवणी यांनी आदेश काढून राजेश यांना निलंबित केले.

आज तकच्या वृत्तानुसार, राजकीय पक्षाच्या रॅलीत सहभागी होऊन त्यांनी मध्य प्रदेश नागरी सेवा आचार-१९६५ च्या नियम-५ चे उल्लंघन केल्याचे निलंबनाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. आता या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे शिवराज सिंह चौहान यांची झोप उडाली असल्याचे काँग्रेस आमदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री बाला बच्चन यांनी म्हटले आहे. भाजपच्या राजकीय कार्यक्रमात अशा कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे सर्वांनाच परिचित आहे.

हेही वाचा – Chanakya Niti : आचार्य चाणक्य म्हणतात, जिथे ‘या’ पाच गोष्टी नाहीत, ते ठिकाण ताबडतोब सोडा!

बच्चन म्हणाले की, मी शिक्षकावर कारवाईचे आदेश पाहिले आहेत. यावरून शिवराज सिंह आणि भाजप घाबरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. वेळ आल्यावर मध्य प्रदेश आणि देशातील जनता याचा हिशेब देईल.

निलंबित शिक्षक म्हणाले…

राजेश कनोजे म्हणतात, “मी एक शिक्षक आहे. राहुल गांधींना भेटल्यामुळे मला निलंबित करण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या समस्यांबाबत मी राहुल गांधींना भेटलो. मी त्यांना सांगितले की, जल-जंगल-जमीन कंपन्यांच्या हातात जात आहेत. अधिकार आमच्या लोकांना वन कायद्यांतर्गत मिळायला हवे.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment