Delhi Murder : दिल्लीतील पांडव नगरमध्ये क्राइम ब्रँचने पतीच्या हत्येप्रकरणी एका महिलेला तिच्या मुलासह अटक केली आहे. दोघांनी मयताच्या मृतदेहाचे तुकडे करून ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते आणि रोज गुपचूप एक तुकडा जवळच्या शेतात फेकत होते. अवैध संबंधातून ही घटना घडली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, पूनम आणि तिचा मुलगा दीपक यांनी ही हत्या घडवून आणली. महिलेने पती अंजन दास याला अंमली पदार्थ पाजले आणि त्यानंतर मुलगा दीपकच्या मदतीने त्याची हत्या केली.
हत्येनंतर दोन्ही आरोपींनी अंजन दास यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते त्यांच्या घरातील फ्रीजमध्ये लपवून ठेवले होते आणि नंतर ते तुकडे अक्षरधामसह पांडव नगर परिसरात फेकून दिले होते. या प्रकरणी महिलेसह दोन आरोपींना अटक करण्यासोबतच, जवळपास बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी फ्रीजही जप्त केला आहे.
हेही वाचा – Video : फिफा वर्ल्डकपमध्ये पराभवामुळं गदारोळ; बेल्जियममध्ये दंगल; लोकांनी जाळल्या गाड्या!
A woman along with her son arrested by Crime Branch in Delhi's Pandav Nagar for murdering her husband. They chopped off body in several pieces,kept in refrigerator & used to dispose of pieces in nearby ground: Delhi Police Crime Branch
(CCTV visuals confirmed by police) pic.twitter.com/QD3o5RwF8X
— ANI (@ANI) November 28, 2022
अवैध संबंधातून खून झाल्याचा संशय
या हत्येमागे अवैध संबंध असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. याआधी दिल्लीत श्रद्धा वॉकरची हत्या करण्यात आली होती आणि तिच्या मृतदेहाचे ३६ तुकडे करून जंगलात फेकण्यात आले होते. या हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहे.