Most Expensive Land In Mumbai : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, कोट्यधीश उद्योगपतींपासून ते प्रसिद्ध स्टार लोक येथे राहतात. मुंबईत घर बांधणे आणि जमीन खरेदी करणे सोपे नाही. कारण, येथे प्रॉपर्टीचे दर खूप जास्त आहेत. मुंबईतील महागड्या घरांबाबत अनेकदा बातम्या येत असतात, मात्र यावेळी जमिनीच्या तुकड्याबाबतची बातमी आहे. एका भूखंडाचा सौदा 455 कोटी रुपयांना झाला आहे. स्क्वेअर यार्ड्सनुसार, अग्रवाल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडने मुंबईतील अत्यंत मागणी असलेल्या जुहू भागात 455 कोटी रुपयांची जमीन विकत घेतली आहे. हा भूखंड शापूरजी पालोनजी ग्वाल्हेर प्रायव्हेट लिमिटेडकडून घेतला होता.
या भूखंडाच्या नोंदणीचे दस्तऐवज पाहिल्यानंतर स्क्वेअर यार्ड्सने सांगितले की, ही जमीन अंदाजे 1,819.90 स्क्वेअर मीटर (19,589.22 स्क्वेअर फूट) परिसरात पसरलेले आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये नोंदणी झाल्यानंतर जमिनीचा हा व्यवहार अंतिम झाला. या भूखंडाच्या नोंदणीमध्ये 27.30 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे.
हेही वाचा – धोनीला, हॉकीला आणि आता गुकेशला विश्वविजेता केलं, भारतावर ‘या’ फॉरेन कोचचं लय प्रेम!
तत्पूर्वी, अग्रवाल होल्डिंग्सने सप्टेंबर 2022 मध्ये जुहू येथे अंदाजे एक एकर आणि तीन-चौथ्या एकर क्षेत्रफळाच्या दोन जमीन पार्सल एकूण 332.8 कोटी रुपयांच्या मोबदल्यात विकत घेतल्या होत्या. स्क्वेअर यार्ड्सच्या कॅपिटल मार्केट्स अँड सर्व्हिसेसचे संस्थापक आनंद मूर्ती म्हणाले, “मुंबई ही देशाची व्यावसायिक राजधानी आहे आणि एक प्रमुख व्यवसाय केंद्र आहे, त्यामुळे येथील मालमत्तेच्या किमती खूप जास्त आहेत.”
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील अनेक ठिकाणांना मुंबईत सर्वाधिक मागणी आहे. त्याच वेळी, जुहू आणि वांद्रे हे समुद्राच्या सान्निध्यात आणि लक्झरी गृहनिर्माण प्रकल्पांमुळे गुंतवणुकीसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत. अलिकडच्या वर्षांत अनेक अब्जाधीश उद्योगपतींनी मुंबईत अपार्टमेंटसाठी मोठे सौदे केले आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!