Most Dangerous Weapons Than Brahmastra : ब्रह्मास्त्र या बॉलिवूड चित्रपटाचा प्रदर्शनापूर्वीच निषेध होत आहे. #BoycottBrahmastra च्या नावानं विरोधक सोशल मीडियावर मोहीम चालवत आहेत. आज आम्ही तुम्हाला प्राचीन भारतातील शस्त्रं आणि अस्त्रं कोणती होती, याविषयी माहिती देणार आहोत. प्राचीन भारतातील अशी अस्त्रं ज्यांचा अग्नी पुराणात उल्लेख आहे. त्यांचा फरक स्पष्ट केला आहे. प्राचीन शस्त्रं दोन प्रकारची होती. शस्त्रं म्हणजे जी हातानं चालवली जातात. उदाहरणार्थ, तलवार, गदा, भाला, कुऱ्हाड, हातोडा. आणि अस्त्र आहेत, म्हणजे जी मंत्रोच्चार करून समोर येत होती.
अस्त्रं पाच प्रमुख भागात विभागली
अग्नी पुराणातील अस्त्रं पाच प्रमुख भागात विभागली आहेत. पहिलं यंत्रमुक्त म्हणजे ती अस्त्रं जी कोणत्याही यंत्रापासून मुक्त असतात. दुसरं पाणिमुक्त म्हणजे हाताने फेकलेली अस्त्रं. तिसरं मुक्तासंधारिता म्हणजे फेकून मागे खेचता येणारी अस्त्रं. चौथं मुक्ता ज्यांना फेकण्याची गरज नाही आणि पाचवं बहुयुद्ध म्हणजे अशी अस्त्रं जी जवळच्या लढाईसाठी वापरली जात होती.
यापैकी चौथं अस्त्र (मुक्ता) असं आहे की ज्यामध्ये यंत्र किंवा हात वापरला जात नाही. हे प्राचीन भारतातील सर्वात शक्तिशाली अस्त्रांपैकी एक मानलं जात असे. ते मंत्रांच्या माध्यमातून चालवलं जात होतं. या पाच अस्त्रांमध्ये विष्णुचक्र, वज्रास्त्र, ब्रह्मास्त्र, नारायणस्त्र आणि पाशुपतस्त्र यांचा समावेश होतो. याशिवाय आणखी बरीच अस्त्रं आहेत, जी तुम्ही टीव्हीवर रामायण आणि महाभारताच्या मालिकांमध्ये पाहिली असतील.
हेही वाचा – VIDEO : तुम्हाला माहितीये ‘ब्रम्हास्त्र’ बनवण्याची आयडिया दिग्दर्शकाला कशी सुचली?
अस्त्रांची माहिती
अग्निस्त्र म्हणजे अग्नीचं शस्त्र. ते कोणत्याही सामान्य मार्गानं विझवता येत नाही. वरुणस्त्र म्हणजे मोठ्या प्रमाणात पाणी फेकणारे शस्त्र. सहसा या अस्त्राचा वापर अग्निस्त्र रोखण्यासाठी केला जात असे.
नागस्त्र
नागस्त्र हे साप फेकण्यासाठी वापरलं जाणारं अस्त्र होतं, त्याच्या वापरामुळं मृत्यू निश्चित मानला जात होता. नागपाशस्त्र चालवून शत्रूची अस्त्रं विषारी सापांसह बांधली जात होती. इतर कोणत्याही अस्त्रानं ते नष्ट करता येत नव्हतं. खरं तर ते त्या काळातील जैविक अस्त्र होतं, ज्याचा वापर संपूर्ण सैन्याला बेशुद्ध करण्यासाठी किंवा एका फटक्यात मारण्यासाठी केला जात असे.
नारायणास्त्र
नारायणस्त्र हे सर्वात शक्तिशाली अस्त्रांपैकी एक आहे. कोणालाही कुठंही संपवण्याची क्षमता यात होती. ते कोणीही रोखू शकत नव्हतं. ते थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शरण जाणं. महाभारताच्या युद्धाच्या १६व्या दिवशी अश्वत्थामानं ते चालवलं होतं. तेव्हा कृष्णानं सर्व अस्त्रे खाली ठेवून पांडवांना शरण येण्यास सांगितलं. नारायणास्त्र हे भगवान विष्णूचे अस्त्र आहे जे ते असुरांना मारण्यासाठी वापरतात. हे खूप शक्तिशाली आणि विनाशकारी आहे. त्याची शक्ती अमर्याद आहे म्हणून कोणीही सामान्य माणूस ते हाताळू शकत नाही. असं म्हणतात की जर नारायणास्त्र एकदा वापरलं तर ते रोखू शकले नाही. जर कोणी एकदा नारायणस्त्र चालवलं तर ते शत्रूला कोणत्याही प्रकारे मारल्यानंतरच परत येत असे.
भार्गवस्त्र
भार्गवस्त्र म्हणजे परशुरामानं कर्णाला दिलेलं अस्त्र. यानं एका फटक्यात पांडवांची अखंड सेना उद्ध्वस्त केली. हे इंद्रस्त्रापेक्षा अधिक शक्तिशाली अस्त्र मानलं जातं. जर ते थांबवले नाही तर ते संपूर्ण ग्रह नष्ट करू शकतं. हेल अस्त्र चालवणाराच तो थांबवू शकतो.
हेही वाचा – कन्फर्म झालंच..! ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात झळकणार शाहरुख खान; पाहा प्रोमो!
ब्रह्मास्त्र सर्वात शक्शिाली
ब्रह्मास्त्र हे सर्व अस्त्रांपेक्षा वरचढ मानलं जातं. असं म्हटलं जातं की त्याच्यामुळं भयंकर विनाश होतो. संपूर्ण वातावरण नष्ट होतं. कोणतंही जीवन शिल्लक राहत नाही किंवा त्याच्याशी संबंधित कोणताही स्त्रोत नाही. स्त्री-पुरुष नपुंसक होतात. पाऊस थांबतो. वेदांमध्ये पर्याय नसताना ही अस्त्रं वापरण्यास सांगितले आहे. पुराणात असा उल्लेख आहे की जेव्हा ब्रह्मास्त्र चालवलं जातं तेव्हा १० हजार सूर्याच्या उष्णतेइतका अग्नी बाहेर पडतो. भयंकर धूर निघतो.
पाशुपतस्त्र, ब्रह्मशिस्त्र आणि ब्रह्मांडास्त्र
पाशुपतस्त्र हे सर्वात घातक अस्त्रांपैकी मानलं जाते. हे त्याचं लक्ष्य पूर्णपणे नष्ट करतं. लक्ष्य कितीही शक्तिशाली असो. यानंतर ब्रह्मशिस्त्र म्हणजे ब्रह्मास्त्रापेक्षा चौपट अधिक शक्तिशाली असं अस्त्र आहे. या शस्त्रापासून ब्रह्मास्त्राचा जन्म झाला असं मानलं जातं. शेवटी, सर्वात धोकादायक अस्त्र म्हणजे संपूर्ण सूर्यमाला किंवा विश्वाचा नाश करू शकणारे ब्रह्मांडास्त्र.