Panchayat 3 Date : भारताच्या सर्वात भारी सीरिजचा तिसरा भाग ‘या’ तारखेला येणार!

WhatsApp Group

Panchayat 3 Date : ‘पंचायत 3’ या लोकप्रिय वेब सीरिजची प्रतीक्षा आता संपली आहे. निर्मात्यांनी सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ही वेब सिरीज 28 मे 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Amazon Prime वर स्ट्रीम होईल. या नव्या सीझनमध्ये जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय आणि सान्विका पुन्हा एकदा कलाकार म्हणून पुनरागमन करणार आहेत.

ही वेब सीरिज जगभरातील 240 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी व्यतिरिक्त, ते तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये देखील डब केले जाईल. ‘पंचायत’च्या गेल्या दोन हंगामात फुलेरा गावातील रहिवासी वेगवेगळ्या आव्हानांशी झुंजताना दिसले. आता नव्या सीझनसोबत ही मालिका नवे वळण घेणार आहे.

हेही वाचा – मुंबईकरांसाठी मोठी बातमी! बेस्ट बसचा प्रवास महागणार; एसीचे तिकीट…

‘पंचायत’ची निर्मिती ‘द व्हायरल फिव्हर’ने केली आहे. त्याचबरोबर या मालिकेचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे, तर चंदन कुमार यांनी ‘पंचायत 3’ ची कथा लिहिली आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘पंचायत 3’ आधी 15 जानेवारीला प्रीमियर होणार होता. मात्र नंतर ते पुढे ढकलण्यात आले. यानंतर पुन्हा एकदा या लोकप्रिय शोचा तिसरा सीझन मार्चमध्ये येणार असल्याच्या बातम्या आल्या. याबद्दल प्रेक्षक खूप दुःखी होते. पण आता निर्मात्यांनी त्याची अंतिम तारीख जाहीर केली आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment