अमित शाहंची मोठी घोषणा! सहारात अडकलेले पैसे 45 दिवसात मिळणार

WhatsApp Group

Amit Shah : केंद्र सरकारच्या पुढाकारानंतर सहारात गुंतवणूक केलेल्या लोकांना त्यांचे पैसे लवकरच मिळणार आहेत, अशी अपेक्षा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली. ‘CRCS-सहारा रिफंड पोर्टल’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. सहारा समूहाच्या चार सहकारी संस्थांमध्ये जमा केलेले कोट्यवधी लोकांचे कष्टाचे पैसे सुमारे 45 दिवसांत परत करणे हा पोर्टलचा उद्देश आहे. हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगून ते म्हणाले की, अशा परिस्थितीत ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शाहंनी सांगितले की या प्रकरणात अनेक सरकारी एजन्सी सामील आहेत आणि प्रत्येक एजन्सीने मालमत्ता जप्त केली आहे. आता त्यांचे पैसे कोणी रोखू शकणार नाही. एवढेच नाही तर पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर 45 दिवसांच्या आत त्यांना परतावा मिळेल. चार सहकारी संस्थांच्या 10 कोटी गुंतवणूकदारांना 9 महिन्यांत पैसे परत केले जातील, असे सरकारने 29 मार्च रोजी सांगितले होते. सुप्रीम कोर्टाने सहारा-सेबी रिफंड खात्यातून सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज (CRCS) कडे 5,000 कोटी रुपये हस्तांतरित करण्याचे आदेश दिल्यानंतर ही घोषणा झाली.

हेही वाचा – Video : 39 वर्षाच्या फाफ डु प्लेसिसचा खतरनाक कॅच, फिल्डिंग पाहून थक्क व्हाल!

10,000 रुपयांपर्यंतचा परतावा

शाह म्हणाले, ”सुरुवातीला ठेवीदारांना 10,000 रुपयांपर्यंतचा परतावा मिळेल. नंतर ज्यांनी जास्त गुंतवणूक केली आहे त्यांच्यासाठी रक्कम वाढवली जाईल. ते म्हणाले की 5,000 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात 1.7 कोटी ठेवीदारांना दिलासा देण्यास सक्षम असेल. सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि स्टार्स मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या चार सहकारी संस्थांमध्ये सुमारे 2.5 कोटी लोकांच्या 30,000 रुपयांपर्यंतच्या ठेवी आहेत.

ते म्हणाले, ”ठेवीदारांना 5,000 कोटी रुपये दिल्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि त्यांना आणखी निधी देण्याची विनंती करू. त्यामुळे मोठ्या रकमेसह इतर ठेवीदारांचे संपूर्ण पैसे परत येऊ शकतात. वैध दावे सादर करण्यासाठी या सहकारी संस्थांच्या ठेवीदारांसाठी IFCI (IFCA) च्या उपकंपनीद्वारे एक पोर्टल विकसित केले आहे. यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत – मोबाइलसह आधार नोंदणी आणि ज्या बँक खात्यात परतावा जमा करावयाचा आहे त्याच्याशी आधार लिंक करणे. पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर्स ठेवीदारांना मदत करतील.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment