घर विकलं, मुलीशी भेट टाळली आणि.., मोहम्मद अली जिन्नांचा भारतातील शेवटचा दिवस कसा गेला?

WhatsApp Group

मुंबई : भारताच्या फाळणीला जवळपास ७५ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. एवढा प्रदीर्घ काळ लोटूनही पाकिस्तानचे शिल्पकार मोहम्मद अली जिन्ना भारताच्या राजकीय चर्चेपासून कधीच दूर राहिले नाहीत. ७ ऑगस्ट १९४७ रोजी दिल्लीच्या पालम विमानतळावर एक विमान कराचीला उडण्याच्या तयारीत होतं. हे विमान देशाच्या फाळणीला जबाबदार म्हटल्या जाणाऱ्या जिन्ना यांची वाट बघत होतं, हाच दिवस जिन्ना यांचा शेवटचा दिवस होता. यानंतर जिन्ना कधीच भारतात परतले नाहीत. जिन्ना यांना विमानतळावरून सोडण्यासाठी रामकृष्ण दालमिया यांनी खास गाडी पाठवली होती. या कारमध्ये व्यक्ती जिन्ना आणि त्यांची बहीण फातिमा जिन्ना होत्या.

दिल्लीहून गुपचूप निरोप

जेव्हा जिन्ना पालमला पोहोचले तेव्हा काहीच लोक त्यांना निरोप देण्यासाठी आले होते. विमानतळावर शांतता होती. जिन्ना यांनी त्यांना निरोप देण्यासाठी आलेल्या लोकांशी हस्तांदोलन केले आणि वेगवान पावलांनी विमानाच्या दिशेनं निघाले. ते रॉयल एअर फोर्सचं ब्रिटिश विमान होते, जे त्यांना घेऊन जाणार होतं. जिन्ना पटकन विमानाच्या पायऱ्या चढले आणि मग दारातून वळले आणि तिथून दिल्लीला बघितलं. ते नंतर आपल्या सीटच्या दिशेनं निघाले. विमान हवेत असेपर्यंत त्यांची नजर दिल्लीला बघत होती. संपूर्ण प्रवास ते काही बोलले नाहीत.

हेही वाचा – भारताशिवाय १५ ऑगस्टला स्वतंत्र झालेले देश माहितीयेत का? वाचा या दिवसाबद्दलच्या रंजक गोष्टी!

७१ वर्षॉंचे जिन्ना देशाच्या फाळणीनंतर भारतातून बाहेर पडलेल्या पाकिस्तानचं नेतृत्व करणार होते. फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष झाला. लाखो निर्वासित आपली जमीन सोडून दुसऱ्या देशात जात होते.

भारतातील शेवटचा दिवस कसा गेला?

जिन्ना यांचा भारतातील शेवटचा दिवस प्रचंड व्यस्ततेत गेला. कराचीला जाण्यापूर्वी त्यांनी दिल्लीतील १०, औरंगजेब रोड (आता एपीजे कलाम रोड) येथील घर उद्योगपती राम कृष्ण दालमिया यांना तीन लाख रुपयांना विकलं होतं. मात्र, दालमिया यांनी नंतर हे घर डच दूतावासाला विकलं. आजकाल डच राजदूत त्यात राहतात. दिवसभरात ते अनेकांना भेटले. दालमियाही जिन्नांना भेटायला आले होते. त्यांची मुलगी त्या दिवशी मुंबईत होती. पण ते तिच्याशी बोलले नाहीत, ना ती त्यांना भेटली. त्याला मुलीचा नक्कीच राग होता, कारण तिनं नेविल वाडियाशी त्याच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं होतं. शिवाय तिनं जिन्नांसोबत पाकिस्तानात जाण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला होता.

भारत सोडण्यापूर्वी जिन्नांना लॉर्ड माउंटबॅटन यांच्याकडून दोन भेटवस्तू मिळाल्या. एक, त्यांनी त्यांचा एडीसी, एहसान अली यांच्या हवाली केला, जो पाकिस्तानात जाऊन जिन्नांच्या दैनंदिन व्यवहाराचा भाग बनणार होता. यासोबतच बेटन यांनी त्यांची रोल्स रॉयल्स कारही त्यांना भेट म्हणून दिली.

हेही वाचा – Har Ghar Tiranga Abhiyan : २० वर्षांपूर्वी घरांवर तिरंगा फडकवणं बेकायदेशीर होतं! वाचा आपल्या राष्ट्रध्वजाबाबत…

जिन्नांचं विमान थेट पाकिस्तानात मौरीपूर (मसरूर) इथं उतरलं. कराचीतील या हवाई पट्टीवर त्यांच्या स्वागतासाठी ५० हजारांहून अधिक लोक जमले होते. कायदे आझम झिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. यानंतर विमानतळावरून त्यांचा ताफा कराचीच्या रस्त्यावर रवाना झाला. रस्त्याच्या दुतर्फा लोक त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. आपण एक दिवस तिथं परत येऊ या विचारानं जिन्ना यांनी मुंबईतील आपलं घर सोडलं होतं. पण तसं कधी झालं नाही.

Leave a comment