Video : 39 वर्षाच्या फाफ डु प्लेसिसचा खतरनाक कॅच, फिल्डिंग पाहून थक्क व्हाल!

WhatsApp Group

MLC 2023 Faf Du Plessis Catch : 39 वर्षीय स्टार क्रिकेटपटू फाफ डु प्लेसिससने एका मॅचमध्ये कडक कॅच पकडला आहे. या कॅचची चर्चा होत असून त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेजर लीग क्रिकेट (MLC) मध्ये टेक्सास सुपर किंग्जचा (TSK) कर्णधार असलेल्या फाफ डुप्लेसीने सोमवारी एमआय न्यूयॉर्क (MINY) विरुद्धच्या सामन्यात टिम डेव्हिडचा आश्चर्यकारक झेल घेतला.

टीएसकेने 17 धावांनी हा सामना जिंकला आणि डेव्हॉन कॉनवेला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रँड प्रेरी स्टेडियमवर त्याने 55 चेंडूत 74 धावा केल्या. शेवटच्या षटकात 21 धावांची गरज होती. डॅनियल सॅम्सच्या चेंडूवर टीम डेव्हिडने चेंडू चुकीच्या पद्धतीने खेळला. चेंडू ‘नो मॅन्स लँड’च्या दिशेने जात असल्याचे दिसत होते, पण डुप्लेसीने कमाल धावत येत हा झेल टिपला.

हेही वाचा – World Cup 2023 : 27 खेळाडू वर्ल्डकपमधून बाद! BCCI चा अजित आगरकरला आदेश

वयाच्या 39 व्या वर्षी फाफ डुप्लेसीच्या या फिटनेसचे आणि क्षेत्ररक्षणाचे खूप कौतुक होत आहे. डुप्लेसीचा हा व्हिडिओही चाहते सोशल मीडियावर खूप शेअर करत आहेत. एमआय न्यूयॉर्कवर 17 धावांनी विजय मिळवल्यानंतर, टेक्सास सुपर किंग्ज तीन सामन्यांतून 4 गुणांसह गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. फाफ डुप्लेसीचा डावातील हा तिसरा झेल होता. वयाच्या 39 व्या वर्षीही तो उत्कृष्ट फिटनेस आणि क्षेत्ररक्षण कौशल्य दाखवत आहे. विजयानंतर डुप्लेसी त्याच्या क्षेत्ररक्षणावर म्हणाला, ”हा मी आहे. मला क्षेत्ररक्षण आवडते. डेव्हिड मिलरच्या बाबतीतही असेच आहे. आम्ही नेहमी हॉटस्पॉटवर जातो आणि हे करतो.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment