बॉलिवूडमधून शोककळा..! मिर्झापूर फेम ‘स्टार’ अभिनेत्याचे निधन; छातीत दुखत असताना…

WhatsApp Group

Mirzapur Actor Passed Away : लोकप्रिय वेब सिरीज मिर्झापूर फेम अभिनेता शाहनवाज प्रधान यांचे निधन झाले आहे. ‘गुड्डू भैया’ म्हणजेच अभिनेता अली फजलच्या सासऱ्याच्या व्यक्तिरेखेसाठी प्रसिद्ध असलेल्या शाहनवाज यांचे शुक्रवारी निधन झाले, त्यामुळे चाहते आणि बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत. इतकंच नाही तर ते त्यांच्या अभिनय कारकिर्दीची आठवण काढताना दिसत आहेत.

बातमीनुसार, ५६ वर्षीय शाहनवाज प्रधान एका कार्यक्रमाचा भाग बनले होते. जिथे त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. शाहनवाजचे सहअभिनेते राजेश तैलंग यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा – IPL 2023 Schedule : पहिली मॅच धोनीची..! आयपीएलच्या वेळापत्रकाची घोषणा

शाहनवाज प्रधान मिर्झापूरमध्ये गुड्डू भैय्याचे सासरे म्हणून लोकप्रिय झाले होते. त्यांनी या मालिकेत श्वेता (गोलू) आणि श्रेया पिळगावकर म्हणजेच स्वीटीचे वडील परशुराम गुप्ता यांची भूमिका साकारली होती. शाहनवाज याआधी ८० च्या दशकातील टीव्ही मालिकांमध्ये लोकप्रिय झाला होता. याशिवाय तो सैफ अली खान आणि कतरिना कैफच्या फँटम चित्रपटासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment