मिर्झापूर वेब सीरिजमधील ‘दिग्गज’ अभिनेत्याचं निधन..! चित्रपटसृष्टीत शोककळा

WhatsApp Group

Jitendra Shastri Death : हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. दिग्गज अभिनेते जितेंद्र शास्त्री यांचे निधन झाले. जितेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपटांव्यतिरिक्त सुपरहिट वेब सिरीज मिर्झापूरमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. जितेंद्र शास्त्री यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, आपल्या प्रिय मित्राच्या निधनाची बातमी समजल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार संजय मिश्रा यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

जितेंद्र शास्त्री शेवटचे TVF च्या प्रसिद्ध वेब सीरिज ट्रिपलिंगमध्ये दिसले होते. जितू शास्त्री यांच्या निधनावर सोशल मीडियावर सर्वजण शोक व्यक्त करत आहेत. तसेच, जितेंद्र शास्त्री यांच्या निधनाने चित्रपट अभिनेते संजय मिश्रा यांना खूप दु:ख झाले आहे. संजय मिश्रा यांनी त्यांच्याट्विटर हँडलवर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये संजय मिश्रा यांनी स्वतःचा आणि जितेंद्र शास्त्रीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा – उर्वशी रौतेलानं रागारागात कापले केस..! जाणून घ्या काय होतं कारण

वयाच्या ६५ व्या वर्षी जगाचा निरोप घेण्यापूर्वी जितेंद्र शास्त्री यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाचे योगदान दिले आहे. जितेंद्र शास्त्री यांनी इंडियाज मोस्ट वाँटेड, चरस, लज्जा, ब्लॅक फ्रायडे यांसारख्या अनेक चित्रपटांतून आपल्या उत्कृष्ट अभिनयाचा आदर्श घालून दिला होता. या चित्रपटांच्या माध्यमातून जितू शास्त्री त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील.

Leave a comment