धक्कादायक..! स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी १६ वर्षाची मुलगी रक्त विकायला निघाली

WhatsApp Group

Girl Trying To Sell Her Blood To Buy A Smartphone : सध्या स्मार्टफोनची क्रेझ वाढतच चालली आहे. हे विशेषतः किशोरवयीन मुलांसाठी आहे. एका धक्कादायक घटनेत, १६ वर्षीय मुलीने ९००० रुपयांचा स्मार्टफोन घेण्यासाठी पश्चिम बंगालमधील रक्तपेढीत आपले रक्त विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी मुलीची समजूत काढत तिला रक्तविक्रीपासून रोखले. रिपोर्टनुसार, मुलीचा हेतू कळल्यानंतर रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी चाइल्डलाइन इंडियाला माहिती दिली.

त्यानंतर मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यापूर्वी तिचे समुपदेशन करण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने ९००० रुपयांचा स्मार्टफोन ऑनलाइन ऑर्डर केला होता. पण तिच्याकडे पैसे नव्हते. बालूरघाट जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत काम करणारे कनक कुमार दास यांनी सांगितले की, मुलगी सकाळी दहाच्या सुमारास रक्तपेढीत पोहोचली.

हेही वाचा – Diwali 2022 : चांगली बातमी..! केंद्र सरकार स्वस्तात देणार डाळ आणि कांदा; वाचा!

जिल्हा रुग्णालयाची रक्तपेढी असल्याने ती रक्त घेण्यासाठी आल्याचे त्यांना सुरुवातीला वाटले. पण तिने आम्हाला रक्त विकायचे आहे असे सांगितल्यावर आम्हाला धक्काच बसला. मुलगी अवघी १६ वर्षांची असल्याने अल्पवयीन असल्याने रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी चाइल्डलाइनला १०९८ वर माहिती दिली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment