MG ZS EV : सिंगल चार्जमध्ये 461 किमी धावणारी इलेक्ट्रिक कार लाँच झालीय!

WhatsApp Group

MG Motors ZS EV : मोरिस गॅरेजेसने (MG Motors) भारतीय बाजारपेठेत आपली प्रसिद्ध इलेक्ट्रिक SUV गाडी MG ZS EV एका नवीन अवतारात लॉन्च केली आहे. या गाडीत आता एक नवीन अपडेट आले आहे. कंपनीने या गाडीला ADAS-2 लेव्हल सेफ्टीसह सुसज्ज केले असून तिची किंमत 27.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे. ही किंमत नियमित किमतीपेक्षा 59,000 रुपये जास्त आहे. या गाडीत यात अनेक ड्रायव्हर असिस्ट फीचर्स आहेत.

आत्तापर्यंत, आधीच्या व्हेरिएंटमध्ये ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेव्हल चेंज असिस्ट आणि रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट यासारखी वैशिष्ट्ये उपलब्ध होती. पण आता या नवीन अपडेटनंतर तुम्हाला ट्रॅफिक जॅम असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, स्पीड असिस्ट सिस्टीम आणि अॅडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स देखील एसयूव्हीमध्ये मिळतील.

हेही वाचा – फलंदाजांसाठी धोकादायक असलेला क्रिकेटमधील ‘परफ्यूम बॉल’ म्हणजे काय?

नवीन इलेक्ट्रिक SUV मधील एक खास गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार सहाय्यक प्रणालीला कमी, मध्यम किंवा उच्च वर मॅन्युअली सेट करू शकता. या प्रणालीमध्ये हॅप्टिक, ऑडिओ आणि व्हिज्युअल अशा तीन स्तरांचा इशाराही देण्यात आला आहे. याशिवाय, ZS EV मध्ये इतर कोणतेही बदल केले गेले नाहीत, यात 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, 360-डिग्री कॅमेरा आणि हिल डिसेंट कंट्रोल सारखीच फीचर्स आहेत. यात पॅनोरामिक सनरूफ, 10.1-इंच टचस्क्रीन सिस्टम, वायरलेस फोन चार्जिंग, 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि कनेक्टेड कार देखील आहे.

ड्रायव्हिंग रेंज आणि परफॉरमन्स

या गाडीच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल झालेला नाही, ही SUV पूर्वीप्रमाणेच 50.3kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे, जी 461 किमीच्या ड्रायव्हिंग रेंजसह येते. हा दावा कंपनीचा असला तरी वास्तविक जगात तफावत शक्य आहे. त्याच्या फ्रंट एक्सलमध्ये इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे, जी 176hp पॉवर आणि 280Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की ही एसयूव्ही केवळ 8.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेण्यास सक्षम आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment