MG Comet EV : ३०० किमीची रेंज आणि १० लाखांपेक्षा कमी किंमत..! येतेय स्वस्त इलेक्ट्रिक कार

WhatsApp Group

MG Comet EV : मॉरिस गॅरेजेस (MG Motor) ने आज सर्व अटकळांना पूर्णविराम देत आपल्या आगामी इलेक्ट्रिक कारच्या नावाचे अनावरण केले आहे. कंपनीने शेअर केलेल्या माहितीनुसार, कंपनीने नवीन इलेक्ट्रिक कारचे नाव MG Comet EV ठेवले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चा केली जात होती की कंपनी लवकरच भारतीय बाजारात Wuling’s Air EV वर आधारित स्वस्त इलेक्ट्रिक कार सादर करेल, जी जागतिक बाजारात आधीच उपलब्ध आहे. याआधी ही इलेक्ट्रिक कार भारतीय रस्त्यांवर चाचणीदरम्यान अनेकदा दिसली आहे.

कशी आहे MG Comet EV?

लूक आणि डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ती हॅचबॅक कारसारखी दिसते, परंतु तिचा बॉक्सी लूक इतर कोणत्याही हॅचबॅकपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याची लांबी केवळ २.९ मीटर असून त्यात ३ दरवाजे देण्यात आले आहेत. म्हणजे दोन साइट गेट्स आणि मागील बाजूस एक टेलगेट. कारच्या आत चार जागा देण्यात आल्या आहेत आणि कंपनीचा दावा आहे की ही कार तुम्हाला केबिनमध्ये चांगली जागा देते. कारला २०१०mm चा व्हीलबेस मिळतो, जो केबिनला प्रशस्त बनवण्यास मदत करतो.

भारतीय बाजारपेठेत सादर केलेली कार इंडोनेशियामध्ये विकल्या जाणार्‍या मॉडेलसारखी दिसते. याला समोरील बाजूस एक रॅपराउंड स्ट्रिप मिळते ज्यामध्ये एलईडी लाइटिंग घटक असतात जे विंग मिररपर्यंत संपतात. साइड प्रोफाईलमधील अलॉय व्हील विंडो लाइन आणि बॉडीवरील कॅरेक्टर लाइन्स याला स्पोर्टी लुक देतात.

हेही वाचा – Nagaland Election : नागालँडने रचला इतिहास..! ६० वर्षांत पहिल्यांदाच विधानसभेत एन्ट्री घेणार महिला

पावर आणि परफॉर्मन्स

कंपनीने या इलेक्ट्रिक कारचे नाव नुकतेच घोषित केले आहे आणि तिच्या पॉवरट्रेन किंवा बॅटरी पॅकबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी या कारमध्ये २०-२५kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देऊ शकते, ही बॅटरी Tata Autocop कडून स्थानिक पातळीवर मिळू शकते. सांगितल्याप्रमाणे, ही कार एका चार्जमध्ये २०० ते ३०० किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. यामध्ये कंपनी सिंगल फ्रंट एक्सल मोटर देईल जी ६८hp ची पॉवर जनरेट करू शकते.

फीचर्स आणि किंमत

सध्या या कारच्या बाहेरील चित्रेच शेअर करण्यात आली आहेत, परंतु असे मानले जात आहे की कंपनी या कारच्या केबिनमध्ये १०.२५-इंच स्क्रीन देऊ शकते. याशिवाय कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ड्युअल-टोन इंटीरियर, व्हॉईस कमांड, वायरलेस अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. एवढेच नाही तर या छोट्या कारमध्ये सनरूफचाही समावेश करता येईल. मात्र, याबाबतचा संपूर्ण तपशील येत्या काळात समोर येईल. रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही कार वर्षाच्या मध्यात लॉन्च करू शकते आणि त्याची किंमत १० लाख रुपयांच्या आत ठेवण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Free Travel : करोडो महिलांना होळीची ‘मोठी’ भेट..! मोफत करा प्रवास, ‘या’ सरकारची घोषणा!

नावामागील रहस्य काय?

MG Comet EVच्या नावाबद्दल, एमजी म्हणतात की या आगामी इलेक्ट्रिक कारचे नाव १९३४ च्या प्रसिद्ध ब्रिटिश विमानापासून प्रेरित आहे, ज्याने इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मॅक्रॉबर्टसन एअर रेसमध्ये भाग घेतला होता. मॉरिस गॅरेजची त्यांच्या निवडक वाहनांची नावे दुसऱ्या महायुद्धातील विमानांपासून प्रेरणा घेऊन ठेवण्याची परंपरा आहे, जसे की हेक्टर आणि ग्लोस्टर इ.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment