Mahindra Thar : महिंद्रा थार ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे. तिचे सेकंड जनरेशन मॉडेल लॉन्च झाल्यापासून, गाडीची पसंत खूप वरच्या स्तरावर गेली आहे. सध्या महिंद्रा थारच्या मागणीने नवीन उंची गाठली आहे. नवीन महिंद्रा थारच्या यशामागे अनेक लोक आहेत पण एक व्यक्ती ज्याचे सर्वात मोठे श्रेय आहे, त्या म्हणजे रामकृपा अनंतन, ज्यांना कृपा अनंतन असेही म्हटले जाते. रामकृपा अनंतन या ऑटोमोटिव्ह उद्योगातील एक प्रसिद्ध चेहरा आहेत. त्यांनी महिंद्राला SUV सेगमेंटमध्ये क्रांती घडवून घडवली. अनंतन सध्या ओला इलेक्ट्रिकमध्ये डिझाईन प्रमुख म्हणून काम करत आहेत, महिंद्रा थार, महिंद्रा XUV 700 आणि महिंद्रा स्कॉर्पिओ या तीन लोकप्रिय गाड्याही त्यांच्याच डोक्यातून आल्या आहेत. त्या मुख्य डिझायनर होत्या.
IIT बॉम्बे मधून मास्टर ऑफ डिझाईन प्रोग्राम (IIT Bombay) पूर्ण केल्यानंतर, रामकृपा अनंतन यांना महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडमध्ये नोकरी मिळाली. त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग (BITS) पदवी पूर्ण केली. अनंतन 1997 मध्ये महिंद्रामध्ये इंटीरियर डिझायनर म्हणून करिअरला सुरुवात केली. 2005 मध्ये, त्यांची डिझाईन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्या भूमिकेत त्यांनी लोकप्रिय महिंद्रा XUV 500 SUV डिझाइन केली. त्या भूमिकेत जवळपास 10 वर्षे राहिल्यानंतर, रामकृपा अनंतन यांना मुख्य डिझायनरच्या भूमिकेत पदोन्नती देण्यात आली, त्यानंतर त्यांनी थार, XUV 700 आणि स्कॉर्पिओ या तीन उत्पादनांसाठी आयकॉनिक डिझाइन्स पुन्हा तयार केल्या.
Mahindra Thar, XUV 700 was designed by Ramkripa #Ananthan.
A well-known name in the auto business, Ramkripa Ananthan assisted #Mahindra in revolutionising the SUV market. The Mahindra #Thar, Mahindra #XUV 700, and Mahindra #Scorpio were all designed by Ananthan#india pic.twitter.com/k0DOUSoPtZ— Ronakians (@ronakians) June 8, 2023
हेही वाचा – Flight Booking : हवाई प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ मार्गावरील तिकीटं झाली स्वस्त
अनंतन यांनी महिंद्रा XUV 300 कॉम्पॅक्ट SUV आणि Marazzo MPV सादर करून वैयक्तिक वाहन पोर्टफोलिओ देखील तयार केला, ज्यांची संकल्पना Ssangyong आणि MANA येथे आधारित आंतरराष्ट्रीय संघांसोबत होती. रामकृपा अनंतन 2019 मध्ये महिंद्राच्या डिझाईन प्रमुख बनल्या. अनंतन यांच्या KRUX स्टुडिओने आतापर्यंत Two2 नावाच्या मायक्रो-मोबिलिटी कन्सेप्ट गाडीची संकल्पना केली आहे जी अपसायकल भाग वापरून तयार केली गेली आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!