Gandhi Jayanti : गांधी जयंतीच्या निमित्तानं ‘या’ शहरात मांसविक्रीला बंदी..!

WhatsApp Group

Gandhi Jayanti : कर्नाटकातील बंगळुरूमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजेच २ ऑक्टोबरला मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. होय आणि याबाबत ब्रुहत बंगळुरू महानगर पालिके (BBMP) कडून आदेशही जारी करण्यात आला आहे. जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, आज म्हणजेच रविवारी बीबीएमपीच्या अखत्यारीत येणारी सर्व मांसाची दुकाने आणि कत्तलखाने बंद राहतील. स्थानिक भाषेत हा आदेश जारी करण्यात आला आहे.

ही पहिलीच वेळ नाही, तर याआधीही बीबीएमपीकडून मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. वास्तविक, ऑगस्ट महिन्यातच बीबीएमपीने एका आदेशान्वये गणेश चतुर्थी, जन्माष्टमी, शहीद दिनी मांसविक्री आणि जनावरांच्या कत्तलीवर बंदी घातली होती. होय आणि या वर्षाच्या सुरुवातीला असाच आदेश रामनवमी, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जारी करण्यात आला होता. गांधी जयंती दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते.

हेही वाचा – VIDEO : नवी मुंबईत भयानक घटना..! अवघ्या काही सेंकदात बिल्डिंग कोसळली; Video व्हायरल

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment