Indian Who Owns A Bugatti Chiron : तुम्ही अशा अनेक भारतीयांबद्दल वाचले आणि ऐकले असेल, जे परदेशात राहतात आणि त्यांच्याकडे महागड्या गाड्या आहेत. असेच एक भारतीय म्हणजे अमेरिकेत राहणारे मयूर श्री (Mayur Shree). मयुर हे बुगाटी शिरॉन या गाडीचे मालक असलेले ते जगातील एकमेव भारतीय आहेत. त्यांच्याशिवाय, कुणा भारतीयाकडे ही गाडी नाही.
मयूर यांनी काही वर्षांपूर्वी शिरॉन खरेदी केली होती. शिरॉनसाठी त्यांनी नेमकी किती किंमत मोजली हे माहीत नाही, परंतु अंदाज आहे की त्यांनी सुमारे 21 कोटी रुपये दिले असावेत. तर, खरेदीदारांना पर्यायी अतिरिक्त उपकरणे बसवल्यास, त्यांना जास्त किंमत मोजावी लागेल.
मयूर हे रिअल इस्टेट व्यावसायिक असून ते टेक्सास, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे कार्यरत आहेत. मयूर यांच्या गॅरेजमध्ये असलेली शिरॉन ही त्याची सर्वात महागडी कार आहे. शिरॉनमध्ये 8.0-लीटर, क्वाड-टर्बोचार्ज्ड W16 इंजिन आहे जे 1,479 Bhp आणि 1,600 Nm पीक टॉर्क निर्माण करते.
हेही वाचा – स्मार्ट मीटरमधील लाल दिवा कशासाठी असतो? त्याच्यामुळे किती खर्च वाढतो?
कारच्या चारही चाकांना वीजपुरवठा करण्यासाठी त्यात हॅलडेक्स ऑल-व्हील-ड्राइव्ह प्रणाली देण्यात आली आहे. जगात बुगाटी शिरॉनचे फक्त 100 युनिट्स आहेत. ही कार रस्त्यावर फार दुर्मिळ आहे. ही जगातील सर्वात वेगवान कार आहे.
या गाडीचा वेग इतका आहे, की त्याचा टॉप स्पीड सामान्य रस्त्यावरही गाठता येत नाही. शिरॉनचा टॉप स्पीड 420 kmph आहे. ही कार 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त 2.5 सेकंद घेते. या सुपरकारचा लूक आणि फीचर्स अशी आहेत की ती पाहून कोणीही खूश होईल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!