Maruti Suzuki Swift 2023 : स्विफ्टचं नवं मॉडेल घालणार धुमाकूळ..! मायलेज ४० kmpl; जाणून घ्या किंमत

WhatsApp Group

Maruti Suzuki Swift 2023 : मारुती सुझुकीने २०२२ मध्ये आपली बॅलेनो हॅचबॅक ब्रेझा एसयूव्ही अपग्रेड केली आहे. मात्र, परवडणाऱ्या कार खरेदी करणारे ग्राहक मारुती सुझुकी स्विफ्टच्या नवीन मॉडेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही कार सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे आणि २०२३ मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. नवीन स्विफ्टच्या इंजिनपासून ते त्याच्या डिझाइनपर्यंतचे तपशील समोर आले आहेत. नवीन स्विफ्ट मजबूत हायब्रीड तंत्रज्ञानासह सादर केली जाईल, असा दावा केला जात आहे.

मारुती स्विफ्ट २०२३चे डिझाईन

सध्याच्या पिढीच्या तुलनेत नवीन स्विफ्टमध्ये अधिक स्पोर्टी लूक असेल. समोर, हॅचबॅकला नवीन एलईडी घटकांसह पुन्हा डिझाइन केलेली ग्रिल आणि स्लीक हेडलॅम्प मिळेल. याशिवाय अद्ययावत फ्रंट बंपर, ब्लॅक-आउट पिलर, फॉक्स एअर व्हेंट ऑन व्हील आर्च आणि रूफ माउंटेड स्पॉयलर देण्यात येणार आहेत.

हेही वाचा – नवीन वर्षापूर्वी १४ कोटी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, पंतप्रधान मोदींनी केली घोषणा!

मारुती स्विफ्ट २०२३ इंजिन आणि मायलेज

वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, टोयोटाचे स्ट्राँग हायब्रीड तंत्रज्ञान नवीन स्विफ्टमध्ये वापरले जाईल. यात १.२ लीटर, ३-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाईल. ही देशातील सर्वात जास्त इंधन कार्यक्षम कार असू शकते. हायब्रिड तंत्रज्ञानासह, स्विफ्ट हॅचबॅक सुमारे ३५-४० kmpl मायलेज देऊ शकते.

लूक आणि फीचर अपग्रेड्स व्यतिरिक्त, हायब्रीड सिस्टीम असलेली नवीन स्विफ्ट किमतीच्या बाबतीतही थोडी महाग असेल. त्याच्या हायब्रिड आणि नॉन-हायब्रीड व्हर्जनच्या किंमतीमध्ये सुमारे १.५० लाख ते २ लाख रुपयांचा फरक असू शकतो. सर्व-नवीन स्विफ्ट २०२३ च्या उत्तरार्धात किंवा २०२३ च्या सुरुवातीला लॉन्च केली जाऊ शकते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment