मारुती सुझुकीच्या दोन गाड्यांमध्ये प्रॉब्लेम, तुटू शकतं स्टेअरिंग, कंपनीचा मोठा निर्णय!

WhatsApp Group

Maruti Suzuki Recall : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीच्या S-Presso आणि Eeco या दोन स्वस्त कारमध्ये तांत्रिक दोष समोर आले आहेत. यामुळे कंपनीने या दोन्ही कारच्या 87,599 युनिट्स परत मागवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या गाड्यांमध्ये स्टेअरिंग रॉडमध्ये काही संभाव्य दोष आढळून आला आहे, त्यामुळे या गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत.

मारुती सुझुकीच्या या रिकॉलमध्ये या दोन्ही कारच्या मॉडेल्सचा समावेश आहे, ज्यांचे उत्पादन 5 जुलै 2021 ते 15 फेब्रुवारी 2023 दरम्यान करण्यात आले होते. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या रिकॉलमुळे प्रभावित झालेल्या कारच्या स्टेअरिंग रॉडमध्ये काही दोष असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ते तुटू शकतात आणि वाहनाच्या स्थिरतेमध्ये समस्या येऊ शकतात. या संदर्भात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या गाड्या तपासणे आवश्यक आहे.

हेही वाचा – Gold Silver Price Today : आज सोन्या-चांदीचा भाव काय? स्वस्त की महाग? जाणून घ्या!

जर तुम्ही मारुती Eeco आणि S-Presso कारचे मालक असाल आणि तुमच्या कार देखील वर नमूद केलेल्या वेळेच्या दरम्यान बनवल्या गेल्या असतील तर तुमची कार देखील या रिकॉलचा एक भाग असेल. मारुती सुझुकी या रिकॉलमुळे प्रभावित झालेल्या वाहन मालकांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधेल, ज्यासाठी कंपनीच्या अधिकृत डीलरशिप किंवा कार्यशाळेद्वारे ग्राहकांना माहिती दिली जाईल. कंपनीचे म्हणणे आहे की गाडीची तपासणी केल्यानंतर संभाव्य स्पेअर पार्ट बदलण्याची प्रक्रिया मोफत केली जाईल. म्हणजेच यासाठी ग्राहकांकडून कोणतीही रक्कम घेतली जाणार नाही. हे रिकॉल गेल्या 24 जुलै 2023 पासून संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून लागू करण्यात आले आहे.

ऑनलाइन चेक करा

याशिवाय, तुमची कार या रिकॉलचा भाग आहे की नाही हे तुम्ही ऑनलाइन देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला (Marutisuzuki.com) भेट द्यावी लागेल. येथे शीर्षस्थानी तुम्हाला Important Customer Info वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या पेजवर याल. मारुती सुझुकीच्या नवीन रिकॉलची लिंक येथे आहे, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्ही दुसऱ्या पेजवर पोहोचाल, येथे माहितीच्या खाली ‘Click Here’ बटण दिलेले आहे, ते दाबल्यानंतर तुम्हाला एक बॉक्स दिसेल जिथे तुम्हाला तुमच्या गा़डीचा चेसिस नंबर टाकावा लागेल.

या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमची गाडी चेक करू शकता.

Maruti S-Presso And Eeco Recall: Check Online

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment