

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) एक स्वस्त कार उत्पादक म्हणून ओळखली जाते, परंतु गेल्या काही वर्षांपासून, कंपनी जवळजवळ प्रत्येक विभागात आपली उपस्थिती नोंदवून या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे आणि मोठ्या प्रमाणात कंपनी यामध्ये यशस्वी देखील आहे. एसयूव्ही सेगमेंट, ज्यामध्ये आतापर्यंत महिंद्रा आणि टाटा सारखे खेळाडू आघाडीवर होते, आता मारुती सुझुकी देखील त्या विभागात चांगली कामगिरी करत आहे.
गेल्या मार्चमध्ये, मारुती सुझुकीच्या दोन SUV ने टॉप 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत स्थान मिळवले आहे. ज्यात मारुती ब्रेझा आणि नुकतीच लाँच झालेली ग्रँड विटारा (Maruti Suzuki Grand Vitara) यांचा समावेश आहे. मासिक विक्रीमध्ये, मारुती ग्रँड विटाराने महिंद्रा स्कॉर्पिओ आणि किया सेल्टोस सारख्या मॉडेल्सला मागे टाकले आहे.
कशी आहे मारुती ग्रँड विटारा ?
मारुती सुझुकी ग्रँड विटारा ला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, पेट्रोल इंजिनसह येणारी ही एसयूव्ही अलीकडेच सीएनजी व्हेरिएंमध्ये सादर करण्यात आला. लाँचच्या वेळी, कंपनीने या एसयूव्हीची प्रारंभिक किंमत 10.45 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली होती. आता कंपनीने मारुती ग्रँड विटाराच्या किंमतीत जवळपास 30,000 रुपयांची वाढ केली आहे. ग्रँड विटाराच्या बेस सिग्मा व्हेरियंटच्या किंमती आता रु. 10.70 लाखांपासून सुरू होतात, ज्या पूर्वी रु. 10.45 लाख होत्या.
हेही वाचा – बँक अकाऊंटमध्ये 10 लाख असतील तरच लंडनला जाता येतं? तपासा सत्य!
Grand Vitara मध्ये, कंपनीने 1.5-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 103bhp पॉवर आणि 136Nm टॉर्क जनरेट करते. तर CNG मोडमध्ये त्याचे पॉवर आउटपुट थोडे कमी होते आणि CNG मोडमध्ये हे इंजिन 87bhp पॉवर आणि 121.5Nm टॉर्क जनरेट करते. या SUV मध्ये फक्त 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन इंजिनचा पर्याय उपलब्ध आहे.
मायलेज
कंपनीचा दावा आहे की त्याचे माइल्ड-हायब्रिड व्हेरिएंट 19 ते 21 किलोमीटर प्रति लिटर आणि स्ट्रांग हायब्रिड प्रकार 27.97 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देतात. दुसरीकडे, सीएनजी व्हेरिएंटबाबत कंपनी म्हणते की ही SUV 26.6km/kg पर्यंत मायलेज देते. कंपनीने ही SUV फ्युचरिस्टिक डिझाइन लँग्वेजवर तयार केली आहे. यामध्ये अॅडवान्स फीचर्स आणि तंत्रज्ञानाची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!