‘या’ 8 लाखांच्या गाडीची तगडी डिमांड, तब्बल 48,000 लोकांना पाहावी लागतेय वाट!

WhatsApp Group

Maruti Suzuki Pending Orders : मारुतीकडे ग्रँड विटारा, ब्रेझ्झा आणि अलीकडेच लाँच झालेल्या जिम्नीसाठी एकूण 98000 ऑर्डर वेटिंग म्हणजेच प्रलंबित आहेत. तीन SUV मधील सर्वात परवडणारी ऑफर – मारुती ब्रेझ्झा (Maruti Suzuki Brezza) कडे सध्या प्रलंबित ऑर्डरची सर्वाधिक संख्या आहे. बहुतेक महिन्यांसाठी ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी SUV देखील राहिली आहे. कंपनीकडे मारुती ब्रेझ्झासाठी 48000 प्रलंबित ऑर्डर, मारुती ग्रँड विटारासाठी 27000 आणि मारुती जिम्नीसाठी 23000 प्रलंबित ऑर्डर आहेत. अशा प्रकारे, तिन्ही SUV साठी एकूण 98000 ऑर्डर प्रलंबित आहेत.

मारुती ब्रेझ्झाची किंमत रु. 8.29 लाखांपासून सुरू होते आणि रु. 14.14 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. ब्रेझ्झासहा मोनोटोन आणि तीन ड्युअल टोन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचे ZXI आणि ZXI Plus रूपे ब्लॅक एडिशनमध्ये देखील उपलब्ध आहेत.

या 5-सीटर SUV मध्ये 328 लीटरची बूट स्पेस उपलब्ध आहे. याला 1.5-लिटर पेट्रोल इंजिन (101 PS आणि 136 Nm), 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते.

हेही वाचा  – BMW ची सर्वात स्वस्त गाडी! शानदार लूक, 20 किमीचं मायलेज

या इंजिनसोबत CNG चा पर्याय उपलब्ध आहे. तथापि, CNG व्हेरिएंटला 88PS आणि 121.5Nm आउटपुट मिळते. CNG व्हेरिएंट फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. टॉप-स्पेक ZXI+ वगळता सर्व व्हेरिएंटसह CNG किट पर्याय उपलब्ध आहे.

पेट्रोलवर, ब्रेझ्झा 20.15 kmpl चे मायलेज देऊ शकते तर CNG वर ते 25.51 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते. यात 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅडल शिफ्टर्स (ऑटोमॅटिक व्हेरिएंट), सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, हेड्स-अप डिस्प्ले आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखी फीचर्स आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment