Maruti Gypsy Electric : मारुती जिप्सी, ज्याने अनेक दशके भारतीय रस्त्यावर आपली हुकुमत गाजवली, ती पूर्णपणे नवीन इलेक्ट्रिक अवतारात सादर करण्यात आली आहे. ही जुनी जिप्सी खास भारतीय लष्करासाठी तयार करण्यात आली आहे, जी भारतीय लष्कर, आयआयटी दिल्ली आणि टॅडपोल प्रोजेक्ट्स नावाच्या स्टार्टअपने रीट्रोफिट केली आहे. गेल्या शुक्रवारी आर्मी कमांडर्स कॉन्फरन्समध्ये (ACC) या मारुती जिप्सी इलेक्ट्रिक गाडीचे प्रदर्शन करण्यात आले. ACC हा द्विवार्षिक कार्यक्रम आहे आणि भारतीय सैन्याच्या सर्वात मोठ्या सोहळ्यापैकी एक आहे.
Tadpole Projects स्टार्टअपने या ऑपरेशनमागे काम केले आहे, हे स्टार्टअप आयआयटी-दिल्ली अंतर्गत उबवले गेले आहे. या स्टार्टअपच्या अधिकृत वेबसाइटनुसार, Tadpole Projects मुख्यत्वे विंटेज कार आणि जिप्सी यांच्याशी संबंधित आहे. हे स्टार्टअप जुन्या व्हिन्टेल कार्सचे रीट्रोफिट देखील करते, ज्याद्वारे जुन्या गाड्या सुधारित केल्या जातात आणि नवीन पद्धतीने तयार केल्या जातात.
Maruti Gypsy Electric Showcased For Indian Army. The Indian Army Cell, IIT-Delhi, and a start-up named Tadpole Projects collaborated to convert Military Gypsy SUVs into electric vehicles. #MarutiGypsyElectric #IndianArmy pic.twitter.com/HjNl7Gxr3A
— Ashwani Kumar (@ashwinsatyadev) April 22, 2023
हेही वाचा – MG Comet EV : फक्त 2 दरवाजांची गाडी..! देशात लाँच झाली जबरदस्त मिनी इलेक्ट्रिक कार
भारतीय लष्कराची इलेक्ट्रिक जिस्पी
या इलेक्ट्रिक जिस्पीच्या मूळ डिझाइनमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, जरी ‘EV’ बॅजिंग आणि भारतीय लष्कराचा लोगो एसयूव्हीच्या शरीरावर देण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की या मारुती जिस्पीला इलेक्ट्रिक अवतारमध्ये रूपांतरित करण्यासाठी 30 किलोवॅट क्षमतेचा किट वापरण्यात आला आहे, जो एका चार्जमध्ये 120 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतो.
पहिली जिप्सी
मारुती जिप्सीचा भारतीय लष्कराशी खूप जुना संबंध आहे, ही SUV अनेक दिवसांपासून लष्कराच्या सेवेत आहे. कंपनीने डिसेंबर 1985 मध्ये पहिल्यांदा मारुती जिप्सी सादर केली होती, त्यावेळी ही SUV भारतीय बाजारात 970 cc F10A सुझुकी इंजिनसह लॉन्च करण्यात आली होती. सुरुवातीला, हे फक्त सॉफ्ट-टॉप म्हणून उपलब्ध होते, परंतु नंतरचे हार्डटॉप लोकप्रिय झाल्यानंतर हार्डटॉपसह ऑफर केले गेले. कंपनीने 2018 मध्ये अधिकृतपणे उत्पादन बंद केले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!