Mangalyaan Mission : भारताची महत्त्वाची अंतराळ मोहीम आता संपणार आहे. ४५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेली मंगळ मोहीम बंद होणार आहे. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. मार्स ऑर्बिटर मिशन २०१३ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते, २०१४ मध्ये मंगळाच्या कक्षेत मार्स मिशनची स्थापना करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळयानची बॅटरी आणि त्यावर चालणारे इंधन आता संपले आहे, त्यामुळे हे मिशन बंद असल्याचे मानले जात आहे.
इस्रो (इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशन) च्या म्हणण्यानुसार, आता मंगळयानचे इंधन आणि बॅटरी संपली आहे, त्याच्याशी संपर्कही तुटला आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की मिशनने आपले काम चांगले केले आणि अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिले. त्याची मुदत संपली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, ग्रहणामुळे ऑर्बिटरच्या बॅटरीवर परिणाम झाला आहे.
क्षमता ओलांडली
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार मार्स ऑर्बिटर मिशनने आपली वेळ पूर्ण केली आहे. या ऑर्बिटरने ८ वर्षे काम केले, तर केवळ ६ महिने काम करण्याच्या क्षमतेनुसार त्याची रचना करण्यात आली होती. म्हणजेच हे अभियान अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाले. मंगळयानच्या यशावर मिशन मंगल नावाचा चित्रपटही बनवण्यात आला आहे.
हेही वाचा – VIDEO : काय खरं नाय..! ‘हे’ आहेत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचे स्पर्धक!
Still remember that day so well, when @MarsOrbiter entered the red planet's orbit.
September 24, 2014.#Mangalyaan https://t.co/5xusbEvTAu
— Amit Paranjape (@aparanjape) October 2, 2022
भारत आणि इस्रोचे नाव
मंगळयान २०१३ मध्ये प्रक्षेपित करण्यात आले. त्याचे प्रक्षेपण PSLV-C25 द्वारे करण्यात आले. मार्स ऑर्बिटर मिशन हे भारताचे पहिले इंटरप्लॅनेटरी मिशन म्हणून प्रक्षेपित करण्यात आले. या अंतराळ मोहिमेच्या प्रक्षेपणानंतर, भारताची अंतर्गत अंतराळ संस्था इस्रो (ISRO) ही अशी मोहीम प्रक्षेपित करणारी जगातील चौथी अंतराळ संस्था ठरली. मंगळ मोहिमेने भारताला अवकाशाच्या जगात एका नव्या स्थानावर नेले.
मंगळ मोहिमेचा उद्देश मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेणे आणि त्यातील रहस्ये जाणून घेणे हा होता. ही मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आणि या मोहिमेद्वारे मंगळाशी संबंधित अनेक माहिती जगासमोर आली. मंगळ मोहिमेने अवकाशाच्या जगात अनेक नवीन कारनामे केले. मार्स ऑर्बिटर मिशनने हे सिद्ध केले आहे की भारत दुसर्या जगात मिशन डिझाइन करू शकतो, लॉन्च करू शकतो आणि ऑपरेट करू शकतो.