Facebook Bug : आज सकाळी फेसबुकवर एक मोठा घटना घडली. एका बगमुळे फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्गचे एका रात्रीत ११ कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स कमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेसबुकला पुन्हा एकदा बगचा फटका बसला आहे. या बगच्या तांत्रिक दोषामुळे फेसबुकच्या यूजर्सची घसरण वेगाने होत आहे. मात्र, झुकेरबर्गचे सर्व फॉलोअर्स आता परतले आहेत. सध्या झुकेरबर्गचे एकूण ११९,१६९,७४३ आहेत.
मोठी गोष्ट म्हणजे या बगमुळे फेसबुकच्या मालकीची कंपनी मेटा सीईओ मार्क झुकरबर्गचे २० मिलियन फॉलोअर्सही कमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मार्क झुकरबर्गचे आता फक्त ९९९१ फॉलोअर्स राहिले होते. अशा प्रकारे त्यांच्या फॉलोअर्सची संख्या एका झटक्यात ११ कोटींनी कमी झाली आहे. याशिवाय इतर अनेक फेसबुक युजर्सनीही फेसबुक फॉलोअर्स अचानक कमी झाल्याची तक्रार केली आहे. फेक फॉलोअर्सच्या छाटणीचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत मार्क झुकरबर्गसारख्या व्यक्तीचे फॉलोअर्सही फेक होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी कृषी औद्योगिक पार्क उभारणार..! उद्योगमंत्री उदय सामंतांची घोषणा
Mark Zuckerberg has lost about 119 million followers on Facebook
Or more likely… a bug pic.twitter.com/ocaP5fwKzj
— Matt Navarra (@MattNavarra) October 12, 2022
काय कारण असू शकते?
फेक अकाऊंटबाबत फेसबुक कधी-कधी अनेक पावले उचलते, त्यामुळे अनेक यूजर्सचे फेसबुक फॉलोअर्स कमी होतात, पण यावेळी फेसबुक फॉलोअर्सची संख्या पूर्वीपेक्षा खूप जास्त आहे. फेसबुकने हे पाऊल फेक अकाऊंटसाठी उचलले आहे हे सांगणे कठीण आहे, उलट फेसबुकमधील बगमुळे हे घडले आहे. यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे. याबाबत मेटा यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.