मणिपूरची घटना लज्जास्पद, दोषींना सोडणार नाही – पंतप्रधान मोदी

WhatsApp Group

Manipur Woman Paraded Incident : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी माध्यमांना संबोधित करताना मणिपूरमधील घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मणिपूरमधील घटना लज्जास्पद आहे. या घटनेने 140 कोटी देशवासीयांना लाज वाटली आहे. याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली जातील, असे मोदींनी सांगितले. मणिपूर घटनेतील दोषींना सोडले जाणार नाही. मणिपूर घटनेवर राजकारण करू नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, ”माझे हृदय क्रोधाने भरले आहे, वेदनांनी भरले आहे. मणिपूरमध्ये जी घटना समोर आली आहे ती कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. संपूर्ण देशाचा अपमान होत आहे. 140 कोटी देशवासियांना लाज वाटत आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचे आवाहन करतो. विशेषतः आपल्या माता भगिनींसाठी. कठोर पावले उचला.”

हेही वाचा – Emergency Alert : तुम्हालाही आलाय का असा मेसेज? घाबरून जाऊ नका, कारण…

पीएम मोदी म्हणाले, ”घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो, मणिपूरची असो, भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील असो, या देशातील कोणत्याही राज्य सरकारमध्ये राजकारण, कायदे हे वादापेक्षा महत्त्वाचे आहेत, महिलांचा आदर केला जातो आणि मी देशवासीयांना आश्वासन देऊ इच्छितो की, कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही. कायदा त्याच्या सर्व कठोरतेने एकामागून एक पाऊल उचलेल. मणिपूरच्या या मुलींचे जे झाले ते कधीही माफ केले जाऊ शकत नाही.”

मणिपूरमधील घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्याशी संवाद साधून या प्रकरणाची माहिती घेतली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे.

काय प्रकरण आहे?

मणिपूरमधून काल रात्री एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. शेकडो लोकांचा जमाव दोन महिलांना रस्त्यावर नग्नावस्थेत फिरायला लावताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून लोक संतप्त झाले असून प्रशासनाकडून कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. या दोन्ही महिलांवर जवळच्या शेतात सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप एका आदिवासी संघटनेने केला आहे. इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) च्या निवेदनानुसार, राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ही घटना रोजी घडली.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिवसाढवळ्या 2 महिलांची नग्न धिंड काढली जात आहे. महिलांसोबत पुरुषांची झुंबड चालताना दिसत आहे. कुकी संघटना आयएलटीएफचे म्हणणे आहे की हे दोन्ही बळी कुकी समुदायातील होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment