VIDEO : हनुमान चालीसा वाजवल्याबद्दल दुकानदाराला मारहाण, 6 जणांवर गुन्हा दाखल

WhatsApp Group

Man Beaten For Playing Hanuman Chalisa | कर्नाटकातील बंगळुरूमधील नागरथपेट भागात हनुमान चालीसा लावल्याचा आरोप करत मुकेश नावाच्या व्यक्तीवर काही मुस्लिम तरुणांनी त्याच्या मोबाईल शॉपवर हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केला असून 3 जणांना ताब्यात घेतले आहे.

या घटनेची माहिती देताना बंगळुरू पोलिसांनी सांगितले की, रविवारी संध्याकाळी ‘अजान’च्या वेळी सिद्दण्णा लेआउटजवळ दुकानदार आणि काही लोकांमध्ये वाद झाला. दुकानदार जोरात गाणे वाजवत असताना काही मुस्लिम तरुणांनी त्याला अडवले आणि वाद सुरू झाला. यानंतर त्यांनी दुकानदाराला मारहाण केली. हलसूरू गेट पोलीस परिसरात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींना अटक करण्यात व्यस्त आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी संध्याकाळी नागरथपेठ येथे घडली, जिथे 6 जणांच्या टोळक्याने एका दुकानदारावर हल्ला केला. हे लोक त्याच्याकडे पैसे मागायचे, मात्र त्याने ते देण्यास नकार दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. याचा बदला घेण्यासाठी त्यांच्या दुकानात सुरू असलेल्या भक्तिगीतावर आक्षेप घेत त्यांना मारहाण केली.

हेही वाचा – WPL 2024 | श्रेयांका पाटीलने जिंकली पर्पल कॅप, फायनलमध्ये दिल्लीला झुकवलं, RCB च्या विजयाची शिल्पकार

पीडितेला उपचारासाठी व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी धमकावणे, चिथावणी देणे, धोकादायक मार्गाने दुखापत करणे आणि स्वेच्छेने दुखापत करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हलसूर गेटचे एसीपी सांगतात की, मोठ्या आवाजात भक्तिगीते वाजवल्यामुळे काही लोकांनी दुकानदारावर हल्ला केला. तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, यात अन्य कोणाचाही सहभाग नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment