Mallikarjun Kharge Congress President : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले असून आता काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळाला आहे. मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. त्यांना ७८९७ तर शशी थरूर यांना १०७२ मते मिळाली आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर शशी थरूर म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष होणे ही सन्मानाची आणि मोठी जबाबदारीही आहे. खर्गे यांना यात यश मिळावे अशी माझी इच्छा आहे. एक हजाराहून अधिक मित्रपक्षांचा पाठिंबा मिळणे आणि भारतभरातील काँग्रेसच्या अनेक हितचिंतकांच्या आशा आणि आकांक्षा पुढे नेणे हा बहुमान होता, असेही ते म्हणाले.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विजयानंतर दिल्लीतील एआयसीसी कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करण्यात आला. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर शशी थरूर आता मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी पोहोचले आहेत. तत्पूर्वी, त्यांचे अभिनंदन करताना ते म्हणाले की, खर्गे ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतील, अशी आशा आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विजयावर राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट म्हणाले की, ९० टक्के मते खर्गे यांच्या बाजूने आहेत. खऱ्या अर्थाने या लोकशाहीचा विजय आहे. त्याचबरोबर आगामी समस्यांना एकत्रितपणे तोंड देऊ. २४ वर्षांनंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष मिळाले आहेत.
#WATCH | Mallikarjun Kharge wins the Congress presidential elections; celebration visuals from outside the AICC office in Delhi pic.twitter.com/DiIpt5aLpJ
— ANI (@ANI) October 19, 2022
हेही वाचा – Viral Video : तोंडावर आपटले आमदार..! फटाका लावला, घाबरून पळू लागले आणि….
#CongressPresidentElection | Mallikarjun Kharge set to be the new Congress president, received over 7000 votes; Shashi Tharoor garnered over 1000 votes.
(File photos) pic.twitter.com/lx2JCutGrA
— ANI (@ANI) October 19, 2022