Congress President Mallikarjun Kharge : सलग ९ वेळा आमदार असलेले मल्लिकार्जुन खर्गे कोण आहेत?

WhatsApp Group

Congress President Mallikarjun Kharge : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेस पक्षाचे नवे कॅप्टन बनले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांना ७८९७ मते मिळाली, तर शशी थरूर यांना सुमारे १००० मते मिळाली. अशा प्रकारे खर्गे यांनी थरूर यांचा जवळपास ८ पट अधिक मतांनी पराभव केला. मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्ष बनणारे दुसरे दलित नेते ठरले आहेत. यापूर्वी १९७१ मध्ये जगजीवन राम काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. खर्गे हे दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील असले तरी ते उत्तम हिंदी बोलतात. मल्लिकार्जुन खर्गे हे सलग नऊ वेळा आमदार राहिले आहेत. एवढेच नाही तर २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत दिग्गजांचा पराभव होत असतानाही खर्गे यांनी विजयाचा झेंडा फडकावला होता.

पत्रकार परिषदांपासून ते संसदेपर्यंत खरगे आपले शब्द बहुतांशी हिंदीत ठेवतात. २१ जुलै १९४२ रोजी जन्मलेले मल्लिकार्जुन खरगे राजकारणात येण्यापूर्वी वकिलीच्या पेशात होते. कर्नाटकातील एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी पदवी आणि कायद्याचे शिक्षण घेतले. मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारे कर्नाटकातील दुसरे व्यक्ती आहेत. यापूर्वी कर्नाटकचे एस निजलिंगप्पा काँग्रेसचे अध्यक्ष होते. सलग ९ वेळा आमदार झालेले ८० वर्षीय मल्लिकार्जुन खरगे ५० वर्षांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय आहेत. ते गांधी-नेहरूंचे निष्ठावंत मानले जातात आणि अलीकडेच त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

हेही वाचा – Viral Video : तोंडावर आपटले आमदार..! फटाका लावला, घाबरून पळू लागले आणि….

राजकीय कारकीर्दीची सुरुवात..

काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी खर्गे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) मध्ये प्रवेश केला. खर्गे यांनी आपली राजकीय कारकीर्द विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून सुरू केली. शासकीय महाविद्यालय गुलबर्गा येथील विद्यार्थी संघाच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली. १९६९ मध्ये ते एमएसके मिल्स एम्प्लॉईज युनियनचे कायदेशीर सल्लागार बनले. ते संयुक्त मजदूर संघाचे प्रभावी कामगार नेते होते आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अनेक चळवळींचे नेतृत्व केले. १९६९ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि गुलबर्गा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी वयाच्या ७ व्या वर्षी त्यांची आई आणि काही कुटुंबीय गमावले. जातीय तणावामुळे त्यांना त्यांचे जन्मस्थान सोडून शेजारच्या कलबुर्गी जिल्ह्यात स्थलांतरित व्हावे लागले, ज्याला पूर्वी गुलबर्गा म्हटले जायचे. अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी सिनेमा थिएटरमध्ये नोकरीही केली. गेल्या १२ निवडणुकीत त्यांनी ११ वेळा विजय मिळवला आहे. ते तीनदा मुख्यमंत्री झाले. त्यांना ६ भाषांचे ज्ञान आहे. खर्गे यांनी १३ मे १९६८ रोजी राधाबाईशी विवाह केला आणि त्यांना दोन मुली आणि तीन मुलगे आहेत.

हेही वाचा – बीडचा सुपुत्र अविनाश साबळेचा गौरव..! ‘परमार्थ खेल रत्न’ पुरस्कारानं सन्मानित

मोदी लाटेत विजयी

मोदी लाट असूनही, २०१४च्या लोकसभा निवडणुकीत खर्गे यांनी गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यांनी त्यांच्या जवळच्या भाजप प्रतिस्पर्ध्याचा १३,४०४ मतांनी पराभव केला. जूनमध्ये त्यांची लोकसभेतील काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. तथापि, २०१९ मध्ये खर्गे जिंकू शकले नाहीत आणि भाजपचे उमेदवार जी माधव यांनी सुमारे ९५ हजार मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला. यानंतर, १२ जून २०२० रोजी, खर्गे कर्नाटकमधून राज्यसभेवर निवडून आले. फेब्रुवारी २०२१ मध्ये खर्गे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी यूपीए सरकारमध्ये कामगार आणि रोजगार, रेल्वे आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण ही खाती सांभाळली आहेत.

Leave a comment