चीनमध्ये गगनचुंबी इमारतीला ज्वालामुखीसारखी आग..! पाहा थरारक VIDEO

WhatsApp Group

Major Fire Broke Out In China : चीनच्या हुनान प्रांताची राजधानी असलेल्या चांग्शा शहरात एका गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. एका वृत्तानुसार, मध्य चीनच्या चांगशा शहरातील एका गगनचुंबी इमारतीला शुक्रवारी आग लागली, मात्र मृतांची संख्या अद्याप समजलेली नाही. एएफपीच्या अहवालानुसार, २१८ मीटर (७१५ फूट) उंच ही इमारत २००० मध्ये तयार झाली झाली. इमारतीच्या आकारमानामुळे ही भीषण आग अनेक किलोमीटर दूरवरून दिसते. जेव्हा ती बांधली गेली तेव्हा ती चांग्शा शहरातील सर्वात उंच इमारत होती.

इमारतीला लागलेल्या भीषण आगीमुळं अनेक मजले खाक झाले आणि आगीनं भयंकर रूप धारण केलं. घटनास्थळी धुराचे काळे ढग पसरले होते. या इमारतीत सरकारी दूरसंचार कंपनी चायना टेलिकॉमचे कार्यालय असल्याचं अहवालातून समोर आलं आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलं. मात्र उंच इमारतीचे मजले जवळपास पूर्णपणे राख झाले आहेत, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी आग विझवणं आणि बचाव कार्य सुरू केले आहे. या भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी किती लोक आले याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

हेही वाचा – ‘सैराट’ फेम ‘प्रिन्सदादा’ला अटक होण्याची शक्यता..! वाचा नक्की घडलंय काय

 

अग्निशमन दलाच्या ३६ गाड्या घटनास्थळी दाखल

साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी ३.४८ वाजता इमारतीला आग लागली. अग्निशमन दलाच्या ३६ गाड्या आग विझवण्यात गुंतल्या आहेत. १७ अग्निशमन केंद्रांमधून २८० हून अधिक अग्निशमन दलाचे जवान मदत आणि बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले आहेत. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आग धुमसत होती.

Leave a comment