Mahindra Thar Prices Hikes : देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने अलीकडेच त्यांच्या प्रसिद्ध ऑफरोडिंग SUV महिंद्रा थारचे परवडणारे RWD प्रकार लॉन्च केले. हा नवीन प्रकार सादर केल्यानंतर थारच्या रसिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण आता कंपनीने थार रेंजच्या किमती अपडेट करून त्यात वाढ केली आहे. कंपनीने महिंद्रा थारच्या किमतीत 1.05 लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे. नवीन रिअल ड्रायव्हिंग एमिशन (आरडीई) नियमांनुसार अपडेटेड वाहनामुळे त्याची किंमत वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
LX हार्ड टॉप डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) व्हेरिएंट ऑर्डर करण्याचा प्लॅन आखत असलेल्या ग्राहकांना मोठा धक्का बसेल. या व्हेरियंटची किंमत 1.05 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याच वेळी, AX (O) हार्ड टॉप डिझेल मॅन्युअल ट्रान्समिशन रीअर व्हील ड्राइव्ह (RWD) व्हेरियंटची किंमत 55,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे, तर इतर सर्व प्रकारांमध्ये 28,200 रुपयांची समान वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा – Indian Railways : कोणत्या विद्यार्थ्यांना ट्रेनच्या तिकीटांमध्ये सवलत मिळते? वाचा लिस्ट!
महिंद्राच्या किमतींमध्ये या वाढीनंतर, थार रेंज आता AX (O) डिझेल RWD प्रकारासाठी रु. 10.54 लाख आणि AX (O) डिझेल 4WD ट्रिमसाठी रु. 14.49 लाखांपासून सुरू होते. तर LX रेंजची किंमत रु. 12.04 लाखांपासून सुरू होते. LX डिझेल ऑटोमॅटिक 4WD प्रकारासाठी 16.77 लाख रुपये खर्च करावे लागतील. या सर्व किंमती एक्स-शोरूमनुसार देण्यात आल्या आहेत.
येतेय परवडणारी महिंद्रा थार 4×4!
कंपनी फोर व्हील ड्राइव्ह (4×4) प्रणालीसह सुसज्ज असलेल्या थारचा स्वस्त प्रकार लॉन्च करण्याची योजना आखत आहे. महिंद्र थार सध्या दोन ब्रॉड ट्रिममध्ये उपलब्ध आहे ज्यात AX(O) आणि LX समाविष्ट आहेत, जे दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन पर्यायासह येतात. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, कंपनी आता आणखी एक नवीन एंट्री लेव्हल व्हेरिएंट सादर करू शकते जी सध्याच्या AX(O) च्या खाली स्थित असेल आणि अधिक परवडणारी असेल. या नवीन किफायतशीर प्रकाराचे नाव AX AC असेल आणि कंपनी ते 2.2 लिटर डिझेल आणि 2.0 लिटर पेट्रोल इंजिनसह देऊ शकते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!