Mahindra Thar Electric : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने केपटाऊन येथे आयोजित केलेल्या ग्लोबल फ्युचरस्केप इव्हेंटमध्ये महिंद्रा थारचे कॉन्सेप्ट मॉडेल म्हणजेच थारचे इलेक्ट्रिक व्हर्जन सादर केले आहे. हे थारचे 5-डोअर व्हेरिएंट आहे, ज्याच्या ICE व्हेरिएंटची प्रतीक्षा आहे. कंपनीचे म्हणणे आहे की बॉर्न इलेक्ट्रिक रेंजचा एक भाग म्हणून Thar.e विकसित केली जाईल, म्हणजे ती ICE व्हेरिएंट (रेग्युलर पेट्रोल-डिझेल) मॉडेलचे इलेक्ट्रिक व्हर्जन नसेल. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही पूर्णपणे रीडिझाइन करण्यात आली असून यामध्ये कंपनीचा नवीन लोगो दिसणार आहे.
कंपनीने Mahindra Thar.e ला एक अतिशय आकर्षक आणि भविष्यवादी डिझाइन दिले आहे. याला चौकोनी आकाराचा LED हेडलॅम्प आहे. समोरील स्टीलचा बंपर लूक वाढवतो. मागील बाजूस स्पेअर व्हील आणि स्क्वेअर एलईडी टेललॅम्प देण्यात आले आहेत.
Here's the first official look at the 5-door Thar.e concept by @Mahindra_Auto
What do you think about the design? #Futurescape #GoGlobal pic.twitter.com/mHpMz8ey6I
— Autocar India (@autocarindiamag) August 15, 2023
Mahindra Thar.e ची रचना कंपनीने एक प्रगत वाहन म्हणून केली आहे. तिच्या डॅशबोर्डला किमान डिझाइन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यात मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि नवीन स्टीयरिंग व्हील आहे. याशिवाय कंपनीने तिच्या इंटीरियरबद्दल अजून कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.
हेही वाचा – कोल्ड्रिंक्समध्ये किती साखर असते? वाचाल तर प्यायच्या आधी विचार कराल!
पॉवर आणि परफॉरमन्स
कंपनीचे म्हणणे आहे की नवीन महिंद्रा थार इलेक्ट्रिक नवीन INGLO P1 प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल, जी एसयूव्हीला उत्तम ग्राउंड क्लिअरन्स तसेच सर्वोत्तम ऑफ-रोडिंग क्षमता प्रदान करेल. INGLO म्हणजे IN- (इंडिया) आणि GLO (ग्लोबल). SUV मध्ये अतिरिक्त दरवाजे आणि बॅटरी पॅक बसवण्यासाठी Thar.e चा व्हीलबेस 2,775 mm ते 2,975 mm पर्यंत असण्याची अपेक्षा आहे.
Mahindra Thar electric concept revealed – Thar.e
How’s the design? pic.twitter.com/bhoqKgQk8I
— MotorBeam (@MotorBeam) August 15, 2023
कधी लाँच होणार?
महिंद्रा थार इलेक्ट्रिकच्या लाँचबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. परंतु कंपनीचा नवीन इलेक्ट्रिक वाहन प्लांट पुढील वर्षी मार्च 2024 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात, पुढील वर्षाच्या अखेरीस किंवा वर्ष 2025 मध्ये लाँच केले जाऊ शकते अशी अपेक्षा केली जाऊ शकते. सध्या तरी याबद्दल काहीही सांगणे थोडे कठीण आहे. कंपनी पुढील वर्षी महिंद्रा थारचे नियमित 5-डोअर मॉडेल लाँच करणार आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!