Mahindra Scorpio EMI : नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ घ्यायचीय? किती उत्पन्न लागेल? वाचा EMI चं गणित!

WhatsApp Group

Mahindra Scorpio EMI Calculator : महिंद्रा अँड महिंद्राची स्कॉर्पिओ एसयूव्ही देशात खूप विकली जाते आणि अनेकांना ही कार खरेदी करायची आहे. स्कॉर्पिओ ही देशातील लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. जर तुम्हालाही नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी करायची असेल, तर यासाठी तुमचा पगार किती असावा हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया या गाडीची किंमत आणि EMI संबंधित माहिती.

किंमत

महिंद्रा स्कॉर्पिओ दोन मॉडेल्समध्ये बाजारात विकली जाते, ज्यात महिंद्रा स्कॉर्पिओ एन आणि महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक यांचा समावेश आहे. या दोन्ही कारची एक्स-शोरूम किंमत 13 लाख रुपयांपासून सुरू होते. ज्याची दिल्लीत ऑन-रोड किंमत 15.81 लाख रुपये आहे. ज्यामध्ये 1.67 लाख नोंदणी, 88 हजारांचा विमा आणि 27 हजारांचे इतर शुल्क समाविष्ट आहे. आता तुम्ही ही कार विकत घेण्यासाठी सुमारे 20% म्हणजेच 3 लाख रुपये डाउन पेमेंट दिले तर. त्यामुळे यानंतर तुम्हाला उर्वरित रकमेसाठी कर्ज घ्यावे लागेल. जे तुम्ही 5 वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला त्यावर 9% व्याज बँकेला द्यावे लागेल. या गणितानुसार, तुम्हाला दरमहा 26,500 रुपये EMI म्हणून भरावे लागतील.

हेही वाचा – Sankashti Chaturthi 2023 Chandrodaya Time : आज एकदंत संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजा पद्धती

वित्त नियमांनुसार, तुमच्या गाडीचा EMI तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 10% पेक्षा जास्त नसावा. त्यानुसार, जर तुमचा पगार दरमहा 2.6 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरच तुम्ही ही गाडी खरेगी करावी. जेणेकरून तुम्ही वेळेवर EMI भरू शकाल आणि तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. पण जर तुम्ही एवढा EMI भरू शकत नसाल तर तुम्हाला डाउन पेमेंटची रक्कम वाढवण्याचा विचार करावा लागेल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment