Mahindra Best Selling Cars March 2023 : महिंद्राच्या एसयूव्ही गाड्यांची बाजारात मोठी मागणी आहे. सध्या ही देशातील चौथ्या क्रमांकाची कार विकणारी कंपनी आहे. कंपनीची महिंद्रा स्कॉर्पिओ बरीच लोकप्रिय आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की महिंद्रा स्कॉर्पिओ ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार नाही. खरं तर, महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही बोलेरो आहे. मार्च 2023 मध्ये, महिंद्रा बोलेरोने कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV मध्ये पहिले स्थान मिळवले आहे. याआधीही अनेक वेळा बोलेरो स्कॉर्पिओपेक्षा जास्त विकली गेली आहे.
महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी कार
गेल्या मार्च महिन्यात, महिंद्रा बोलेरोने एकूण 9,546 युनिट्सची विक्री केली आहे आणि यामध्ये महिंद्रा बोलेरो निओच्या विक्रीच्या आकडेवारीचाही समावेश आहे. त्याच वेळी, महिंद्रा स्कॉर्पिओच्या एकूण 8,788 युनिट्सची विक्री झाली आहे आणि यामध्ये स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक या दोन्हींच्या विक्रीच्या आकडेवारीचा समावेश आहे. स्कॉर्पिओ आणि बोलेरोच्या किमतीत अनेक लाखांचा फरक आहे. महिंद्रा बोलेरोची किंमत 9.78 लाख रुपयांपासून सुरू होते. स्कॉर्पिओची सुरुवातीची किंमत 12 लाखांपेक्षा जास्त आहे.
हेही वाचा – Electric Car : 708 किमी रेंज, मोबाईलपेक्षा फास्ट चार्जिंग..! Kia च्या इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू
कंपनीच्या उर्वरित गाड्यांबद्दल बोलायचे झाले तर, महिंद्रा XUV300 तिसऱ्या क्रमांकावर आहे. मार्च महिन्यात 5,128 युनिट्सची विक्री झाली आहे. त्याचप्रमाणे XUV 700 चौथ्या क्रमांकावर आणि महिंद्र थार पाचव्या स्थानावर आहे. या दोन्ही कारच्या अनुक्रमे 5,107 युनिट्स आणि 5,008 युनिट्सची विक्री झाली आहे.
महिंद्राच्या टॉप-5 बेस्ट सेलिंग एसयूव्ही (मार्च 2023)
- महिंद्रा बोलेरो : 9546 युनिट्स विकल्या.
- महिंद्रा स्कॉर्पिओ : 8,788 युनिट्स विकल्या.
- महिंद्रा XUV300 : 5,128 युनिट्स विकल्या.
- महिंद्रा XUV700 : 5,107 युनिट्स विकल्या.
- महिंद्रा थार : 5,008 युनिट्स विकल्या.
महिंद्राची विक्री वाढली
मार्च महिन्यात महिंद्राच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर, मार्च महिन्यात महिंद्राच्या एकूण विक्रीत 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च 2023 मध्ये ते 66,091 युनिट्सवर पोहोचले तर मार्च 2022 मध्ये कंपनीने डीलर्सना 54,643 युनिट्सचा पुरवठा केला. कंपनीने सांगितले की मार्च महिन्यात युटिलिटी वाहनांची घाऊक विक्री 31 टक्क्यांनी वाढून 35,976 युनिट्सवर पोहोचली आहे. एका वर्षापूर्वी (मार्च 2022) याच कालावधीत ते 27,380 युनिट होते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!