Mahindra Thar आता स्वस्तात मिळणार..! कंपनी आणतंय नवीन मॉडेल; जाणून घ्या किंमत!

WhatsApp Group

Mahindra Thar New Model : महिंद्रा थार ही देशातील लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. ज्या ग्राहकांना ऑफ-रोडिंग आवडते ते या वाहनाची जोरदार खरेदी करतात. नवीन अवतारात आल्यापासून या एसयूव्हीवर सर्वांची नजर आहे. थारची किंमत रु. १३.५८ लाख पासून सुरू होते आणि रु. १६.२८ लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. अनेक ग्राहकांना महिंद्र थार आवडतो पण त्याची किंमत जास्त असल्याने ते खरेदी करू शकत नाहीत. अशा ग्राहकांसाठी महिंद्राने आनंदाची बातमी आणली आहे. कंपनी महिंद्रा थार एसयूव्हीचे स्वस्त व्हर्जन लॉन्च करणार आहे. महिंद्रा कंपनी लवकरच थारचे सर्वात स्वस्त मॉडेल भारतात लॉन्च करू शकते, ज्याची किंमत सध्याच्या बेस व्हेरियंटपेक्षा कमी असेल. नुकतेच थारच्या या नवीन मॉडेलचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

या थारमध्ये फोर-व्हील ड्राइव्ह (4WD) लीव्हर दिलेले नसल्याचे समोर आले आहे. म्हणजेच, हे या एसयूव्हीचे २ व्हील ड्राइव्ह (2WD) व्हर्जन असेल. यात १.५ लिटर डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. थार २ व्हील ड्राइव्ह व्हर्जन आता महिंद्राच्या डीलरशिप यार्ड्सवर येण्यास सुरुवात झाली आहे, जी पुष्टी करते की कार लवकरच बाजारात येणार आहे.

हेही वाचा – Income Tax Slab : १० लाखांवर ‘एवढा’ इन्कम टॅक्स लागणार; जाणून घ्या बजेटपूर्वी महत्त्वाचं अपडेट!

या परवडणाऱ्या थारमध्ये फोर-व्हील ड्राइव्ह सिस्टीम असणार नाही. हे फक्त रियर-व्हील ड्राइव्ह आहे. यात १.५-लिटर डिझेल इंजिन मिळेल, जे XUV 300 मध्ये देखील आढळते. हे इंजिन ११६ Bhp आणि ३०० Nm चे पीक टॉर्क आउटपुट देते. पॉवरच्या बाबतीत ते फोर-व्हील ड्राइव्ह व्हर्जनपेक्षा कमी असेल.

थार २ व्हील ड्राइव्ह ही या एसयूव्हीचा नवीन एंट्री-लेव्हल प्रकार असेल. कमी शक्तिशाली इंजिन आणि फोर-व्हील ड्राइव्ह सिस्टीमच्या अनुपस्थितीमुळे त्याची किंमत खूपच आक्रमक होऊ शकते. महिंद्राने थार २ व्हील ड्राइव्हच्या सेंटर कन्सोलमध्ये स्टार्ट/स्टॉप फंक्शन आणि लॉक/अनलॉक बटण जोडले आहे. उर्वरित वैशिष्ट्ये तशीच राहण्याची अपेक्षा आहे. लुकच्या बाबतीतही ते फोर-व्हील ड्राइव्ह मॉडेलसारखे दिसते. फक्त ‘4×4’ बॅजिंग असणार नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment