महाराष्ट्राचा जावई आणि सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दु:खाचा डोंगर!

WhatsApp Group

Mahesh Babu Father SuperStar Krishna Death : साऊथचा सुपरस्टार महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टमनेनी यांचे निधन झाले आहे. महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी हे तेलुगूचे प्रसिद्ध अभिनेते होते. सुपरस्टार कृष्णा म्हणून त्यांची ओळख होती. वयाच्या ७९ व्या वर्षी चित्रपटसृष्टीने एक दिग्गज गमावला आहे. मंगळवारी पहाटे ४ वाजता हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर कृष्णा घट्टमनेंना रुग्णालयात दाखल केले होते. कृष्णा यांच्या निधनाबद्दल तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी शोक व्यक्त केला आहे. महेश बाबूच्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून चाहते भावूक झाले आहेत. सोशल मीडियावर चाहते आणि सेलेब्स टॉलिवूडच्या दिग्गज स्टारला श्रद्धांजली नाहत आहेत. कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनाच्या वृत्ताने तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा – मुंबईत गोवरचा उद्रेक..! ७४० मुलांमध्ये लक्षणं; तिघांचा मृत्यू!

महेश बाबू यांच्या कुटुंबासाठी हा काळ अडचणींचा आहे. कुटुंब एका भावनिक शोकांतिकेतून जात आहे. महेश बाबूने दोन महिन्यांपूर्वी आई गमावली होती. महेश बाबूच्या वडिलांचे तेलुगू चित्रपटसृष्टीत मोठे नाव होते. ते कृष्णा म्हणून ओळखले जात होते. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक यासोबतच ते राजकारणीही होते. ५ दशकांच्या कारकिर्दीत ते जवळपास ३५० चित्रपटांमध्ये दिसले. त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले. कृष्णा यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात छोट्या भूमिकांमधून केली. १९६१ मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मुख्य अभिनेता म्हणून, ते १९६५च्या थेने मनसुलु चित्रपटात दिसले. आपल्या कामाने त्याने लोकांची मने जिंकली आणि तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत एका मोठ्या स्टारचा दर्जा मिळवला.

Leave a comment