Mahatma Gandhi Jayanati In Marathi : 2 ऑक्टोबरला संपूर्ण देश गांधी जयंती साजरी करतो. आजकाल शाळांमध्ये गांधीजींच्या संदर्भात अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. पण आज आम्ही तुम्हाला गांधीजींशी संबंधित अशा वस्तूंबद्दल सांगणार आहोत ज्यांचा सर्वाधिक किमतीत लिलाव झाला आहे. या लिलावात गांधीजींचे मृत्युपत्र (Mahatma Gandhi’s Last Will) सर्वात महाग किमतीत विकले गेले. यासोबतच गांधीजींची तपकिरी चप्पल (Mahatma Gandhi’s Slippers) आणि चामड्याची पिशवीही (Mahatma Gandhi’s Bag) या लिलावात विकली गेली. या दोन्ही गोष्टींसाठी खरेदीदारांनी खूप जास्त किंमत दिली होती.
गांधीजींचे मृत्युपत्र किती किमतीला विकले गेले? (Last Will Of Mahatma Gandhi)
एबीपीच्या वृत्तानुसार, महात्मा गांधींनी त्यांचे दोन पानांचे गुजराती भाषेत लिहिलेले मृत्युपत्र होते. गांधींनी दोन पानांत लिहिलेल्या मृत्युपत्राची लिलावात किंमत 55 हजार पौंड होती. जे आजच्या भारतीय रुपयांमध्ये 55 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे याच्या लिलावासाठी 30 ते 40 हजार पौंडांची बोली सुरू झाली. मात्र, हे मृत्युपत्र कोणी विकत घेतले याची माहिती आजपर्यंत कुणालाच नाही.
हेही वाचा – Vande Bharat Sleeper : वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी धावणार? किती डब्बे असणार? जाणून घ्या!
चप्पल आणि बॅग किती किमतीला विकली गेली? (Slippers Bag Of Mahatma Gandhi)
याच लिलावात गांधीजींच्या एका तपकिरी लेदरच्या चपलाचाही लिलाव झाला. यासाठी खरेदीदारांनी 19000 पौंडांची बोली लावली होती. जर याचे भारतीय रुपयात रूपांतर केले तर ते सुमारे 19 लाख रुपये होईल. बीबीसीमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मुंबईतील जुहू बीचजवळ त्या घरात राहणाऱ्या लोकांकडून या चपला सापडल्या आहेत. महात्मा गांधी 1917 ते 1934 पर्यंत येथे वास्तव्यास होते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!