मुंबईकरांसाठी मोठी बातमी! बेस्ट बसचा प्रवास महागणार; एसीचे तिकीट…

WhatsApp Group

Mumbai BEST Bus Ticket Fare : मुंबईत अनेक ठिकाणी नागरिक बसने प्रवास करतात. मात्र, आता बेस्टच्या तिकीट दरात आणखी वाढ होणार असून त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. बेस्ट बसच्या तिकीट दरात आता 5 रुपयांवरून 7 रुपयांपर्यंत वाढ होणार आहे. एसी बसच्या तिकीट दरातही वाढ होणार आहे. एसी बसचे भाडे प्रति 10 किमी 3 रुपयांनी महागणार आहे.

बेस्टमधून दररोज सुमारे 35 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे बेस्टची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – निवडणुकीनंतर लागू होणार 8वा वेतन आयोग? केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट? जाणून घ्या!

तिकीट दरवाढीवरून आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, “येथील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने बेस्ट बस भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही नेहमीच म्हणत आलो की भाजप मुंबईविरोधी आहे आणि ही प्रस्तावित भाडेवाढ हा मुंबईकरांच्या खिशाला खिंडार पाडण्याचा दुसरा मार्ग आहे. म्हणजे, आम्ही भाडे जगातील सर्वात परवडणारे ठेवले आहे आणि तरीही आम्ही 10,000 इलेक्ट्रिक बसेसचा ताफा वाढवत आहोत, मुंबई विरोधी भाजप राजवट भाडे वाढवून आणि बस कमी करून मुंबईकरांना त्रास देत आहे.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment