महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर!

WhatsApp Group

Maharashtra Jharkhand Election Date : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात आणि झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. तर झारखंडमध्ये 13 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे.

महाराष्ट्रासोबतच झारखंडच्या निवडणुकीचा निकालही 23 नोव्हेंबरला लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्र आणि झारखंडसह, काही वायनाडसह अनेक जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे, तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 5 जानेवारीला संपणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक

अधिसूचना जारी करण्याची तारीख- 22 ऑक्टोबर 2024
नामांकनाची अंतिम तारीख – 29 ऑक्टोबर 2024
नामांकन छाननीची तारीख – 30 ऑक्टोबर 2024
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – 3 नोव्हेंबर 2024
मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर 2024
निवडणूक निकालांची तारीख – 23 नोव्हेंबर 2024

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment