मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) हे कुशल वक्ते आणि चतुर राजकारणी म्हणून ओळखले जातात. एक काळ असा होता, जेव्हा ते एका सामान्य शेतकरी कुटुंबातून भोपाळमध्ये शिक्षणासाठी आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. त्यांनी आयुष्यभर लग्न न करण्याची शपथ घेतली होती, पण एका मुलीला पाहून ते तिच्या प्रेमात पडले.
त्याआधी शिवराज सिंह यांना लग्न करायचे नव्हते. मग जेव्हा ते साधना सिंह यांन भेटले आणि त्यांना पाहिलं तेव्हा ते आयुष्यभर लग्न न करण्याची शपथ घेतल्याची शपथच विसरले.
शिवराज यांनी किशोरवयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला होता. संघाशी संबंध आल्यानंतर ते अभ्यासाबरोबरच संघाच्या कार्यात सक्रिय झाले. यानंतर त्यांना वाटू लागले की, संघाच्या तत्त्वज्ञानाशी पूर्णपणे जोडलेले राहायचे असेल, तर लग्न करू नये. त्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही आपला हेतू कळवला.
मात्र, घरच्यांना त्यांचा हा मानस अजिबात मान्य नव्हता. लग्नासाठी त्याच्यावर सतत दबाव टाकला जात होता. त्यांनी नेहमीच नकार दिला, असे अनेक वेळा घडले. मग दुसरे स्थळ आले. यावेळी त्यांच्या बहिणीने त्यांच्यावर किमान या स्थळातील मुलीला जाऊन पाहण्यासाठी दबाव आणला. यावेळी त्यांना आपल्या बहिणीचे म्हणणे ऐकावे लागले.
मुलीला पाहण्यासाठी शिवराज वडील आणि बहिणीसोबत गेले होते. मुलीला पाहताच त्यांचा लग्न न करण्याचा बेत निघून गेला. साधना सिंह पहिल्याच नजरेत त्यांना इतक्या आवडल्या की ते त्यांच्या प्रेमात पडले.
हेही वाचा –IPL 2024 Auction ची तारीख, जागा ठरली! 77 खेळाडूंचे नशीब पालटणार
त्यांनी साधना यांची पुन्हा भेट घेतली. यावेळी दोघांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. शिवराज यांनी त्यांना आपली मनातली इच्छा बोलून दाखवली. साधना यांना शिवराज यांचा साधेपणा आणि स्पष्टवक्तेपणा आवडला. एकंदरीत त्यांच्या प्रेमाची गाडी पुढे सरकली. साधना त्यांना पत्रे लिहू लागल्या. शिवराज यांनी आपल्या भावी पत्नीला एक नाही, तर अनेक पत्रे लिहिली होती. दोघांनी 1992 मध्ये लग्न केले. शिव-साधना ही जोडी सध्या हिट आहे. एक कुशल व्यवस्थापक आणि रणनीतीकार म्हणूनही त्यांची ओळख आहे. दोघांच्या लग्नाला 31 वर्षे झाली आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!