

Lucknow Guy Bitten By Pet Dog : पाळीव कुत्रा चावल्याच्या अनेक बातम्या देशाच्या अनेक भागांतून चर्चेत असतात. याच क्रमाने लखनऊच्या कृष्णनगर पोलीस स्टेशन परिसरात आणखी एक प्रकरण समोर आले आहे. इथं एका तरुणाचा शेजारच्या पाळीव कुत्र्यानं चावा घेतला. यादरम्यान कुत्र्यानं पीडितेच्या गुप्तांगाचाही चावा घेतला. गंभीर जखमी तरुणाला उपचारासाठी केजीएमयूमध्ये दाखल करण्यात आलं. केजीएमयूमधून डिस्चार्ज झाल्यानंतर, गुरुवारी तरुणानं पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल केला, तेव्हा ही बाब उघडकीस आली.
ही घटना ३ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी कृष्णानगर पोलीस तपास करत आहेत. लखनऊ येथील प्रेमनगर येथील रहिवासी संकल्प निगम (२३) या युवकावर पाळीव कुत्र्यानं हल्ला केला. यानंतर पीडित संकल्प निगमला केजीएमयूमध्ये उपचार घ्यावे लागले. कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाला इतका त्रास झाला, की त्याला दोन दिवस वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करावं लागलं. कुत्र्याच्या मालकाकडून नुकसान भरपाईची मागणीही तरुणानं केली आहे.
हेही वाचा – VIDEO : ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला! पडले १५० टाके; चेहऱ्यावरचं मांसही…
पीडित तरुणाने आपल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे, की ३ सप्टेंबर रोजी रात्री जागरण कार्यक्रम आटोपून तो पायी घरी जात होता. शंकर नावाचा माणूस वाटेत शिवमंदिराजवळ कुत्रा फिरवत होता. मंदिरासमोर येताच कुत्र्यानं त्याच्यावर हल्ला केला. पळून जाण्यासाठी आरडाओरडा करून कुत्र्याचा मालक शंकर यांची मदत घेतली. मात्र शंकरनं कुत्र्याला हटवण्याचा प्रयत्न केला नाही. कुत्र्याच्या तावडीतून कशीतरी सुटका करून त्यानं तेथून पळ काढला.
पीडित तरुण, संकल्प निगमच्या म्हणण्यानुसार, कुत्र्यानं त्याच्या गुप्तांगाचा चावा घेतला होता. तो उपचारासाठी लोकबंधू रुग्णालयात गेला, तेथून त्यांना डॉक्टरांनी केजीएमयूमध्ये पाठवले. तेथे तपासणी केली असता कुत्र्याच्या हल्ल्यात त्याच्या मूत्रमार्गाला गंभीर इजा झाल्याचं निष्पन्न झालं. दोषी व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबरोबरच कुत्र्याच्या मालकाकडून नुकसान भरपाईची मागणीही तरुणानं केली आहे.
पनवेलमध्येही अशीच घटना!
या घटनेसोबतच मुंबईतील एक व्हिडिओ समोर आला आहे. एकापाळीव कुत्र्यानं झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा चावा घेतला. पनवेलमधील कुत्र्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा पाळीव कुत्रा जर्मन शेफर्ड असून तो त्याच्या मालकासह लिफ्टच्या बाहेर उभा होता, तेव्हा झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय लिफ्टमधून बाहेर आला, ते पाहून जर्मन शेफर्डने त्याच्यावर हल्ला केला. या घटनेत व्यक्तीच्या गुप्तांगालाही गंभीर दुखापत झाली आहे.
ये बहुत ही डरावना है..@zomato डिलीवरी बॉय लिफ्ट से निकल रहा था तो उसके प्राइवेट पार्ट में कुत्ते ने काट लिया।
लोग कुत्ते पालते क्यों हैं, जब उन्हें कंट्रोल में नहीं रख पाते।
ऐसे लोगों के खिलाफ कठोर कार्रवाई होनी चाहिए..
घटना पनवेल, मुंबई की बताई जा रही है..#dogbite pic.twitter.com/wgw0aqb4kJ— Adi Vatsal (@VatsalAdi) September 9, 2022