लंडन रिटर्न आणि 25 वर्षाचा देशाचा सर्वात तरुण खासदार!

WhatsApp Group

Loksabha Elections Result 2024 : समाजवादी पक्ष 37 जागा जिंकून उत्तर प्रदेशात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी नवा प्रयोग केला, जो यशस्वी ठरला आहे. सपा प्रमुखांनी अनेक जागांवर नवीन तरुण चेहरे उतरवले होते. या जागा समाजवादी पक्षाने जिंकल्या आहेत. यामध्ये कौशांबीचा समावेश आहे.

कौशांबी

यावेळी सर्वाधिक चर्चेत असलेल्या जागांमध्ये यूपीच्या कौशांबीचा समावेश करण्यात आला. या जागेवर अखिलेश यांनी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी कॅबिनेट मंत्री इंद्रजीत सरोज यांचे पुत्र पुष्पेंद्र सरोज यांना तिकीट दिले होते. भाजपच्या विनोद सोनकर यांचा 1 लाख 3 हजार 944 मतांनी पराभव करत पुष्पेंद्र सरोज यांनी वडिलांच्या पराभवाचा बदला घेतला आहे. पुष्पेंद्र यांना 5 लाख 9 हजार 787 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार सोनकर यांना 4 लाख 5 हजार 843 मते मिळाली. 2019 मध्ये भाजपचे उमेदवार विनोद सोनकर यांनी इंद्रजित सरोज यांचा 38,742 मतांनी पराभव केला.

पुष्पेंद्र सरोज हे देशातील सर्वात तरुण खासदार ठरले आहेत. पुष्पेंद्र सरोज यांनी यावर्षी 1 मार्च रोजी वयाची 25 वर्षे पूर्ण केली आहेत. राजकारणात प्रवेश करून त्यांनी वडिलांचा वारसा पुढे नेला आहे. पुष्पेंद्र सरोज हे लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमधून अकाउंटिंग आणि मॅनेजमेंटमध्ये पदवीधर आहेत.

हेही वाचा – रामाच्या भूमीत भाजपचा पराभव कसा? अयोध्येत मंदिर बांधूनही लोकांनी का नाकारलं? ही कारणं…

पुष्पेंद्र सरोज यांचे वडील इंद्रजित सरोज यांच्याबद्दल सांगायचे तर त्यांनी बहुजन समाज पक्षातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. सन 1996 मध्ये ते प्रथमच बसपचे आमदार झाले, सन 2012 पर्यंत त्यांना मांझनपूर (राखीव) मतदारसंघातून कोणीही पराभूत करू शकले नाही. ते तीन वेळा बसपचे मंत्रीही होते. बसपमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून पक्षाची सेवा केली.

इंद्रजीत सरोज हे पक्षाचा गैर-जाटव दलित चेहरा आहेत. सरोज ज्या पासी समाजातून येतात तो जाटव नंतरचा दुसरा मोठा दलित समाज आहे. अवधपासून पूर्वांचलपर्यंतच्या प्रदेशातील राजकीय समीकरणे घडवण्यात आणि बिघडवण्यात पासी समाजाची महत्त्वाची भूमिका आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment