Women Reservation Bill : दिवसभराच्या चर्चेनंतर लोकसभेने बुधवारी महिला आरक्षणाशी संबंधित (128वी घटनादुरुस्ती) विधेयक-2023 मंजूर केले. लोकसभेच्या 454 खासदारांनी ‘नारी शक्ती वंदन कायदा-2023’ (Nari Shakti Vandan Adhiniyam) या विधेयकाच्या बाजूने मतदान केले, जे देशाच्या लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देते. त्याचवेळी दोन खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केले. महिला आरक्षणाशी संबंधित ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी लोकसभेत मांडले.
आता या विधेयकावर गुरुवारी राज्यसभेत चर्चा होणार आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी सभागृहात याची घोषणा केली. ते म्हणाले की, सभागृहातील विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी येथे संविधान विधेयक, 2023 वर चर्चा करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा – शंकर देवाच्या गळ्यातील नाग कोणता आहे? त्याचे महत्त्व काय? तो कुठे आढळतो?
ते म्हणाले की, लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर ते वरच्या सभागृहात चर्चेसाठी आणि मंजूर करण्यासाठी मांडले जाईल. या विधेयकावर चर्चेसाठी साडे सात तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
सध्या लोकसभेची एकूण सदस्य संख्या 543 आहे. सध्या महिला खासदारांची संख्या 82 आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेतील महिला खासदारांची संख्या 181 होणार आहे. या विधेयकात संविधानाच्या कलम 239AA अंतर्गत राजधानी दिल्लीच्या विधानसभेत महिलांना 33% आरक्षण दिले जाणार आहे. म्हणजेच दिल्ली विधानसभेतही 70 पैकी 23 जागा महिलांसाठी राखीव असतील. इतर राज्यांच्या विधानसभांमध्येही महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू केले जाईल.
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!