Electric Scooter : आता टेन्शन फ्री होऊन चालवा ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर, धक्का लागला तरी पडणार नाही!

WhatsApp Group

Electric Scooter : मुंबईस्थित लायगर मोबिलिटीने २०१९ मध्ये सेल्फ-बॅलन्सिंग आणि सेल्फ-पार्किंग तंत्रज्ञानासह इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली. आता कंपनीने सांगितले आहे की सेल्फ बॅलन्सिग आणि सेल्फ पार्किंग तंत्रज्ञानासह उत्पादनासाठी तयार इलेक्ट्रिक स्कूटर २०२३ ऑटो एक्सपोमध्ये (Auto Expo 2023) जागतिक स्तरावर पदार्पण करेल. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण करण्यापूर्वी त्याचे दोन फोटो देखील जारी केले आहेत.

स्कूटर आपोआप बॅलन्स होईल!

लक्षणीय गोष्ट म्हणजे, ऑटो-बॅलन्सिंग तंत्रज्ञान पूर्णपणे लायगर मोबिलिटीने इन-हाउस विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान इलेक्ट्रिक स्कूटरला आपोआप बॅलन्स करण्यास सक्षम करते. यामुळे रायडरची सुरक्षितता, आराम आणि सुविधा मोठ्या प्रमाणात वाढेल. ऑटो-बॅलन्सिंग तंत्रज्ञान अभूतपूर्व राइडिंग अनुभव देईल असा कंपनीचा दावा आहे. टीझरमध्ये स्कूटर मॅट रेड कलरमध्ये दिसत आहे.

हेही वाचा – Corona : बापरे बाप..! चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट, मृतदेहांनी भरले शवागृह; पाहा भयानक Video

क्लासिक Vespa आणि Yamaha Fascino पासून प्रेरित डिझाइन!

सेल्फ-बॅलन्सिंग लायगर इलेक्ट्रिक स्कूटर आधुनिक फीचर्स आणि तंत्रज्ञानासह येते. मात्र, त्यात रेट्रो स्टाइल पाहायला मिळणार आहे. हे स्टाइल क्लासिक Vespa आणि Yamaha Fascino द्वारे प्रेरित असल्याचे दिसते. स्कूटरच्या पुढील ऍप्रनवर डेल्टा आकाराचा एलईडी हेडलॅम्प बसवण्यात आला आहे. त्याच्या पुढच्या भागात, वरच्या फेअरिंगवर क्षैतिज एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स देण्यात आले आहेत.

लायगर सेल्फ-बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये

स्कूटरचे गोल आकाराचे एलईडी टर्न इंडिकेटर समोरच्या काऊलवर बसवले आहेत. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलईडी टेल-लाइट, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, रुंद सीट आणि अलॉय व्हील यांसारख्या वैशिष्ट्यांसह येईल. ब्रेकिंगसाठी स्कूटरच्या पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment