LIC ची नवीन धमाकेदार योजना, आयुष्यभर गॅरंटीड रिटर्न्स मिळणार!

WhatsApp Group

विमा क्षेत्रातील दिग्गज कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) म्हणजेच एलआयसीने एक नवीन योजना आणली आहे. या योजनेचे नाव जीवन उत्सव योजना (LIC Jeevan Utsav Scheme In Marathi) असे आहे. विशेष म्हणजे या योजनेत गॅरंटीड रिटर्न्सचे आश्वासन देण्यात आले आहे. ही ‘नॉन-लिंक्ड’, नॉन-पार्टिसिपेट, वैयक्तिक बचत, संपूर्ण जीवन विमा योजना आहे.

एलआयसीचा हा जीवन उत्सव प्लॅन क्रमांक 871 असून, तो आजीवन गॅरंटीड रिटर्नसह येतो. यामध्ये तुम्हाला फुल लाइफ इन्शुरन्स आणि बेनिफिट पेमेंटचा पर्याय मिळतो. यामध्ये प्रीमियम भरण्याचा मर्यादित कालावधी 5 ते 16 वर्षे आहे. प्रीमियम भरतानाच गॅरंटीड वाढ करण्याची तरतूद आहे. यामध्ये तुम्हाला नियमित उत्पन्नाचा लाभ आणि फ्लेक्सी उत्पन्नाचा लाभ मिळेल. किमान मूळ विमा रक्कम 5 लाख रुपये असेल. पॉलिसी सुरू करताना किमान वय 18 आणि प्रीमियम पूर्ण होण्याच्या वेळी कमाल वय 75 वर्षे असावे. या योजनेसह, एलआयसी पॉलिसीधारकाला 5.5% दराने वार्षिक व्याज देखील देईल. पॉलिसीधारकाला या योजनेसह मॅच्युरिटी बेनिफिट मिळणार नाही.

हेही वाचा – नाका कामगारांसाठी खूशखबर! 4 कोटी 85 लाख रुपयांची तरतूद, लोढांची घोषणा

एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी गेल्या आठवड्यात या योजनेबद्दल माहिती दिली होती. ही योजना खात्रीशीर परतावा देईल आणि ते पूर्ण झाल्यानंतर, पॉलिसीधारकाला आजीवन विम्याच्या रकमेच्या 10 टक्के रक्कम मिळेल. नवीन उत्पादन बाजारात खळबळ माजवण्यासाठी ही योजना आहे, असे मोहंती म्हणाले होते. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे असते, की तो किती पैसे देत आहे आणि त्याला 20-25 वर्षांनी किती परतावा मिळेल. याशिवाय कर्ज सुविधा आणि मुदतपूर्व पैसे काढणे या सुविधांचाही या नव्या सेवेच्या फीचर्समध्ये समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment