LIC Policy : फक्त ४५ रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीवर मिळतील २५ लाख! जाणून घ्या एलआयसीच्या ‘या’ जबरदस्त पॉलिसीबद्दल..

WhatsApp Group

LIC Policy : कोणतीही गोष्ट करण्यासाठी इच्छाशक्ती असणे खूप गरजेचे आहे. याशिवाय सोपे कामही शक्य नाही. त्याचप्रमाणे आजपासूनच तुमचे भविष्य सुरक्षित करायचे आहे असे तुम्ही ठरवले तर हे काम तुम्ही अगदी सहज करू शकता. होय, फक्त ४५ रुपये वाचवून तुम्ही लाखोंचे रिटर्न मिळवू शकता. आपण हे कसे करू शकता? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला एलआयसीच्या सर्वोत्तम पॉलिसीमध्ये गुंतवणूक करावी लागेल.

‘अशा’ पॉलिसीचा लाभ घ्या

तुम्हाला एलआयसीच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे काही सरकारी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. जसे आधार कार्ड, बँक खाते. या कागदपत्रांशिवाय, तुम्हाला ही पॉलिसी खरेदी करण्यात अडचणी येऊ शकतात. या योजनेत गुंतवणूक करणे इतके सोपे आहे की मजूर, रस्त्यावरील विक्रेते आणि रिक्षाचालकही यामध्ये गुंतवणूक करू शकतात. विशेषत: या लोकांना डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे.

हेही वाचा – Flipkart Sale : चक्क अर्ध्या किंमतीत मिळतोय Google Pixel 6a स्मार्टफोन; ही संधी सोडू नका!

या पॉलिसीचे नाव जीवन आनंद पॉलिसी (Jeevan Anand Policy) आहे, ज्यामध्ये मॅच्युरिटीचा फायदा आहे. पॉलिसी धारकाचा पॉलिसी दरम्यान मृत्यू झाल्यास, या योजनेअंतर्गत १२५ % परतावा दिला जातो. ज्याला डेथ बेनिफिट म्हणतात. या योजनेत बोनसही दिला जातो. या योजनेमध्ये किमान एक लाख रुपयांची विमा रक्कम आहे आणि कमाल रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.

जर तुम्हाला या योजनेतून २५ लाखांचा निधी बनवायचा असेल तर तुम्हाला दररोज ४५ रुपये वाचवावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही दरमहा १३५८ रुपये गुंतवू शकाल, म्हणजेच तुम्हाला दरमहा केवळ १३५८ रुपये गुंतवावे लागतील. मात्र, तुम्हाला ही गुंतवणूक दीर्घकाळ करावी लागेल. तुम्ही या योजनेसाठी ३५ वर्षांपर्यंत मॅच्युरिटी निवडू शकता. अशा प्रकारे तुम्ही वार्षिक १६ हजार ३०० रुपये गुंतवाल. जर तुम्ही या योजनेत ३५ वर्षे पैसे जमा करत असाल तर तुम्हाला एलआयसीकडून मॅच्युरिटीवर २५ लाख रुपये दिले जातील.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment