LIC Arogya Rakshak : निरोगी आणि सुरक्षित जीवनासाठी आरोग्य रक्षक योजना

WhatsApp Group

LIC Arogya Rakshak | आरोग्य हा जीवनाचा खजिना आहे. आणि स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी काहीजण सकाळी उठून फिरायला जातात, तर काही धावतात. काही जिममध्ये जड वजन उचलतात, तर काही ध्यान आणि योगासने करून तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. या सर्वांशिवाय आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विमा करतो.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-एलआयसी, केवळ तुमच्या जीवनाचीच नाही तर तुमच्या आरोग्याचीही काळजी घेते. एलआयसीने 2021 मध्ये आरोग्य रक्षक ही आरोग्य योजना सुरू केली होती. ही योजना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत विमाधारकास संरक्षण प्रदान करते. एलआयसी आरोग्य रक्षकचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण आजारी पडलो तर आपण करत असलेली बचत भविष्यासाठी खर्च करावी लागत नाही. कारण आजारासाठी वेगळी गुंतवणूक केली नाही तर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर भविष्यातील स्वप्ने साकार करण्यासाठी केलेली बचत खर्च होते.

एलआयसी आरोग्य रक्षक योजना विमाधारकांना एकच नाही तर अनेक फायदे देत आहे. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेट आणि नियमित प्रीमियम वैयक्तिक आरोग्य विमा योजना आहे. एलआयसी आरोग्य रक्षक अंतर्गत, विमाधारकांना अनेक प्रकारचे आरोग्य विमा संरक्षण दिले जाते. 18 ते 65 वयोगटातील लोकांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. या पॉलिसीमध्ये तुम्ही तुमचा जोडीदार, मुले आणि पालक यांचाही समावेश करू शकता. अशाप्रकारे संपूर्ण कुटुंबाला एकाच पॉलिसी अंतर्गत संरक्षण मिळते.

हेही वाचा – तुमची कागदपत्रे सुरक्षित ठेवणारे DigiLocker काय आहे? ते कसे वापरायचे? वाचा

एलआयसी आरोग्य रक्षक योजनेत बालकांना 25 वर्षांपर्यंत आणि पालकांना 80 वर्षांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण मिळते. एलआयसीच्या या प्लॅनमध्ये रायडरचीही सुविधा आहे. तुम्ही राइडर्सद्वारे मुदत विमा आणि अपघात विम्याचे संरक्षण देखील घेऊ शकता.

हॉस्पिटलायझेशन आणि शस्त्रक्रियेचे फायदे

एलआयसी आरोग्य रक्षक पॉलिसी विमाधारक रुग्णालयात दाखल झाल्यास किंवा मोठी शस्त्रक्रिया झाल्यास आर्थिक संरक्षण लाभ प्रदान करते. हॉस्पिटलायझेशनच्या फायद्यात विमाधारकाचे 24 तास सतत हॉस्पिटलायझेशन समाविष्ट असते. याशिवाय काही ऑपरेशन्स देखील या विम्याअंतर्गत येतात.

डे केअर फायदे

डे केअर प्रक्रियेसाठी येणारा खर्च एलआयसी आरोग्य रक्षक योजनेअंतर्गत समाविष्ट केला जातो. हा खर्च प्रत्यक्ष खर्चानुसार दिला जाईल. एलआयसी आरोग्य रक्षक योजनेंतर्गत पॉलिसीधारकाने सलग तीन वर्षे कोणताही दावा केला नाही, तर पॉलिसीधारकाला तीन वर्षांनी सन्मानित करण्याची तरतूद आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment