आता कोका कोलाची दारूही मिळणार, भारतात पहिल्यांदाच विक्री सुरू!

WhatsApp Group

कोका कोला ही जगातील सर्वात मोठी सॉफ्ट ड्रिंक उत्पादक कंपनी भारतात प्रथमच मद्यविक्री क्षेत्रात (Coca-Cola Alcohol) उतरली आहे. कंपनीने आपल्या लिकर ब्रँड ‘लेमन डू’ (Lemon-Dou In Marathi) ची देशात विक्री सुरू केली आहे. सध्या गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात त्याची विक्री होत आहे. त्याच्या 250 मिली कॅनची किंमत 230 रुपये आहे.

कोका कोला इंडियाने देशात दारू विक्री करण्याच्या निर्णयाला दुजोरा दिला आहे. इकॉनॉमिक टाइम्सला माहिती देताना कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, लेमन डूची पायलट चाचणी केली जात आहे. जगातील अनेक बाजारपेठांमध्ये हे ड्रिंक आधीच उपलब्ध आहे. आता आम्ही ते भारतातही आणण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – महाराष्ट्राचा वडापाव जगभर फेमस केला तो तामिळनाडूच्या या माणसाने!

लेमन डू हे एक प्रकारचे अल्कोहोल मिक्स आहे. हे शोचूपासून बनवले जाते. यामध्ये वोडका, ब्रँडी यांसारखे डिस्टिल्ड मद्य वापरले जाते. सॉफ्ट ड्रिंकची बाजारपेठ पूर्णपणे काबीज केल्यानंतर, कोक आणि पेप्सी या जागतिक कंपन्यांनी आता मद्य क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही कंपन्यांनी एक एक करून या बाजारात प्रवेश केला आहे.

कोकने याआधी जपानमध्येही लेमन डू लाँच केले होते. पेप्सीकोने अमेरिकन मार्केटमध्ये माउंटन ड्यूचे अल्कोहोलिक व्हर्जन लाँच केले असून त्याला हार्ड माउंटन ड्यू असे नाव देण्यात आले आहे. जर कोका कोलाचे लेमन डू यशस्वी झाले तर ते भारतातही आणले जाऊ शकते. अलीकडेच कोका कोलाने 3300 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने गुजरातमधील साणंद येथे प्लांट उभारण्याची घोषणा केली होती.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment