लेजेंडरी अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार!

WhatsApp Group

Asha Parekh To Be Honoured With Dadasaheb Phalke Award : प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आशा पारेख यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आशा पारेख यांनी वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी चित्रपटात काम करायला सुरुवात केली. आशा पारेख यांनी ९५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ५२व्या दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यासोबतच आशा पारेख यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान देण्यात येणार असल्याची माहिती दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हा सन्मान प्रदान करतील. ठाकूर यांनी बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रीची या सन्मानासाठी निवड झाल्याबद्दल अभिमान वाटला. तसेच ३० सप्टेंबर रोजी दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा – मर्सिडीज कारच्या धडकेत ट्रॅक्टरचे झाले दोन तुकडे..! पाहा VIDEO

बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात

‘दिल देके देखो’, ‘तीसरी मंझिल’, ‘कटी पतंग’, ‘लव्ह इन टोक्यो’, ‘आया सावन झूम के’, ‘आन मिलो सजना’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आशा पारेख यांनी काम केले. बाल कलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या अनेक दशकांपासून त्या कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘दिल देके देखो’ होता.

मनोरंजन क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९९२ मध्ये भारत सरकारने त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. आशा पारेख १९९८ ते २००१ या काळात सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाही होत्या. आशा पारेख यांची पाच सदस्यीय ज्युरीने या सन्मानासाठी निवड केली. त्यात आशा भोसले, हेमा मालिनी, पूनम ढिल्लन, टीएस नागभरणा आणि उदित नारायण यांचा समावेश होता.

Leave a comment